IPL 2022 Retention: चेन्नई सुपर किंग्ज ‘या’ 4 खेळाडूंना कायम ठेवू शकते, ‘या’ परदेशी खेळाडूलाही मिळणार जागा तर ‘चॅम्पियन’ अष्टपैलूला दाखवणार रस्ता
पुढील महिन्याच्या अखेरीस आयपीएल 2022 साठी मेगा लिलाव होण्याची शक्यता आहे. आयपीएलचा लिलाव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणे समजले जात आहे. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्स खेळाडूंना रिटेन करू शकते अशांची नावे खालीलप्रमाणे आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 2022 सीझनपूर्वी मेगा लिलावाची तयारी सुरू आहे. पुढील महिन्याच्या अखेरीस आयपीएल 2022 साठी मेगा लिलाव (IPL Auction) होण्याची शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी विद्यमान आठ संघांना त्यांचे काही खेळाडू कायम ठेवण्याची संधी मिळेल, तर लिलावात येणाऱ्या खेळाडूंमधून दोन नवीन फ्रँचायझी, लखनौ आणि अहमदाबाद, यांना आवडते खेळाडू निवडण्याची संधी मिळेल. आयपीएलच्या आठ संघांना 4 खेळाडू कायम ठेवण्याची संधी असेल, ज्यात जास्तीत जास्त तीन भारतीय आणि जास्तीत जास्त 2 परदेशी खेळाडू असू शकतात. जर तुम्ही तीन भारतीय निवडले, तर फक्त एक परदेशी खेळाडू ठेवण्याची संधी असेल, तर दोन परदेशी खेळाडू निवडल्यास, फ्रँचायझी फक्त दोन भारतीय खेळाडूंना कायम ठेवू शकतात. आयपीएलचा लिलाव जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणे समजले जात आहे. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्स खेळाडूंना रिटेन करू शकते अशांची नावे खालीलप्रमाणे आहे. (IPL 2022 Auction: ‘या’ अनकॅप्ड भारतीय खेळाडूंचे लिलावात चमकणार नशीब, फ्रँचायझी करू शकतात मालामाल)
चार वेळा आयपीएल चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्जबद्दल बोलायचे तर एमएस धोनी (MS Dhoni) पुन्हा संघाचे नेतृत्व करताना दिसू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त फ्रँचायझी ज्या भारतीय खेळाडूंना त्यांच्यासोबत साथ कायम ठेवू शकतात त्यांच्यात सलामीवीर रुतुराज गायकवाड आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) असतील. तथापि फाफ डु प्लेसिस, मोईन अली, ड्वेन ब्रावो आणि जोश हेझलवूड हे धाकड दावेदार असल्याने परदेशी खेळाडू कोण असेल हे ठरवण्यासाठी फ्रेंचायझीला कसरत करावी लागेल. मात्र डु प्लेसिसला रिटेन करण्याची शक्यता जास्त आहे कारण ही स्पर्धा भारतात होणार असून त्याचा फलंदाज म्हणून विक्रम चांगला आहे. अशा प्रकारे चेन्नई फ्रँचायझी धोनी, गायकवाड, जडेजा आणि डुप्लेसिस यांना कायम ठेवू शकते. अशास्थितीत सीएसके सुरेश रैना, ब्रावो यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
30 नोव्हेंबर ही फ्रँचायझींद्वारे सर्व राखून ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम तारीख असल्याने संघाकडे फारच कमी वेळ आहे. धोनीने 2008 पासून फ्रँचायझीचे नेतृत्व केले आहे आणि लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटू व कर्णधारांपैकी एक आहे. त्याची केवळ उपस्थिती फ्रँचायझीसाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे फ्रँचायझीने सर्वप्रथम धोनीला रिटेन केले तर चकित होऊ नका.