R Ashwin-Jos Buttler Rivalry: जोस बटलर-अश्विन वादावर राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य, म्हणाले - ‘त्यांच्यासाठी बोलणे महत्त्वाचे’
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग 15 मध्ये जोस बटलर आणि रविचंद्रन अश्विन प्रथमच एकाच संघाकडून खेळताना दिसतील. अश्विन पंजाब किंग्जचा कर्णधार असताना आयपीएल 2019 दरम्यान बटलर आणि अश्विन मोठ्या प्रमाणावर ‘मंकडिंग’ वादात अडकले होते. राजस्थान रॉयल्सने अश्विनला आयपीएल मेगा लिलावात 5 कोटी रुपयात खरेदी केले.
R Ashwin-Jos Buttler Rivalry: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 पूर्वीच्या मेगा लिलावामध्ये सर्व सहभागी फ्रँचायझींमधील खेळाडूंमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला. लखनऊ आणि गुजरात, या स्पर्धेत दोन नवीन फ्रँचायझींचा समावेश केल्याने इतर 8 मूळ फ्रँचायझींना संघ रचनांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यास भाग पाडले. अनेक महत्त्वाच्या बदलांपैकी एक म्हणजे भारताचा अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनशी (Ravichandran Ashwin) निगडित होता, ज्याला राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) विकत घेतले. अश्विन 2020 आणि 2021 आवृत्तीत दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कडून खेळला होता. पण लिलावापूर्वी त्याला बाहेर करण्यात आले आणि राजस्थान रॉयल्सने त्याला 5 कोटी रुपयांत खरेदी केले. अशा परिस्थतीत स्टार भारतीय ऑफ-स्पिनर आता इंग्लंडच्या जोस बटलर (Jos Buttler) सोबत ड्रेसिंग रूम शेअर करेल, ज्याला त्याने 2019 हंगामात ‘मंकड’ आऊट केले होते. त्यामुळे आयपीएल (IPL) 2022 मध्ये दोघांची एकमेकांसोबतची जोडी कशी जमेल याकडे प्रत्येक क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून असेल. (IPL Mega Auction 2022: जुन्या वादांशी तोडून नाते दीपक हुडा-कृणाल पांड्या, बटलर-अश्विन एकाच संघात; आपयीएलमध्ये काय घडणार?)
राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनी दोघांमधील मतभेदाला ‘इलेक्ट्रिक प्रतिस्पर्धी’ असे संबोधले आणि त्याबद्दल बोलणे दोघांसाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. श्रीलंकेच्या माजी कर्णधाराने पुढे दोन्ही खेळाडूंना अत्यंत हुशार आणि वचनबद्ध म्हटले. “अश्विन आणि बटरच्या संदर्भात, मला विश्वास आहे की स्पर्धा हायव्होल्टेज होती,” कुमार संगकारा म्हणाले. “ते ज्या रंगमंचावर खेळतात त्या उच्च-कार्यक्षमतेच्या वातावरणाचा हा एक भाग होता. आणि त्यांनी ते त्यांच्या स्वत:च्या मार्गाने हाताळले. मी MCC नियम बदलण्यामागील कारणे पाहिली आहेत हे अशा प्रकारच्या क्षणांमुळे देखील असू शकते जे धारणा बदलतात. जोस आणि अश्विन दोघेही अत्यंत हुशार व मोठे मूल्यवान खेळाडू आहेत. त्याबद्दल बोलणे आणि त्याच्याशी जुळवून घेणे खरोखर महत्वाचे आहे,” संगकारा रेड बुल क्रिकेट रूममध्ये म्हणाले.
दरम्यान, राजस्थान रॉयल्स 29 मार्च रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध त्यांच्या आयपीएल 2022 मोहिमेची सुरुवात करेल. संजू-सॅमसनच्या नेतृत्वातील संघ 2022 मध्ये त्यांच्या दुसऱ्या आयपीएल विजेतेपदाच्या शोधात मैदानात उतरतील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)