IPL Auction 2025 Live

IPL 2022 Orange Cap Winner: आयपीएल 15 चा ‘शतकवीर’ जोस बटलरने जिंकली ऑरेंज कॅप, जाणून घ्या त्याने किती धावा केल्या

जर आपण दरवर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांविषयी चर्चा केली तर त्यात विदेशी खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने ऑरेंज कॅपचा मान मिळवला होता.

जोस बटलर (Photo Credit: PTI)

IPL 2022 Orange Cap: राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर जोस बटलरने इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 मधील मोसमात विक्रमी 863 धावा पूर्ण करत ऑरेंज कॅप जिंकली आहे. उल्लेखनीय म्हणजे, ऑरेंज कॅप स्पर्धेतील सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूला दिली जाते. अंतिम सामन्यात बटलरने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांविरुद्ध थोडा संघर्ष केला परंतु 35 चेंडूंत पाच चौकारांसह 39 धावा करण्यात तो यशस्वी झाला. बटलर आयपीएल 2022 चा स्टार ठरला आणि या वर्षी या स्टार सलामीवीराने चार शतके ठोकली होती. बटलरने सत्राचा शेवट 17 सामन्यांमध्ये 863 धावा करून केला. बटलर आता विराट कोहली (2016 मध्ये 973 धावा) नंतर एका सीझनमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. बटलरपूर्वी वॉर्नरने 17 सामन्यांत (2016 मध्येही) 848 धावा केल्या होत्या. (IPL 2022 Purple Cap: युजवेंद्र चहलच्या डोक्यावर सजली पर्पल कॅप, फायनलमध्ये रेकॉर्ड-ब्रेक कामगिरीसह हसरंगाला मागे टाकलं)

आयपीएल 15 ऑरेंज कॅप खेळाडूंची यादी

दरम्यान लखनौ सुपर जायंट्सचे सलामीवीर - केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी आयपीएल 15 हंगामात अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले. आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस, ज्याने राजस्थानविरुद्ध एलिमिनेटर सामन्यात 25 धावा केल्या, 468 धावांसह चौथ्या स्थानावर असलेल्या सत्राचा शेवट केला. तसेच पंजाब किंग्सचा चा शिखर धवन टॉप-5 मधून बाहेर पडला.

क्रमवारी प्लेअर संघ सामने खेळले धावा
1 जोस बटलर राजस्थान रॉयल्स 17 863
2 केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स 15 616
3 क्विंटन डी कॉक लखनऊ सुपर जायंट्स 15 508
4 हार्दिक पांड्या गुजरात टायटन्स 15 487
5 शुभमन गिल गुजरात टायटन्स 16 483

2008 मध्ये ऑरेंज कॅपवर ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्शने कब्जा केला होता. त्याने किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळत 616 धावा केल्या. यानंतर 2009मध्ये मॅथ्यू हेडन, 2010मध्ये सचिन तेंडुलकर, तर 2011 आणि 12मध्ये क्रिस गेल यांनी हा सन्मान पटकावला. 2013 मध्ये माइकल हसी, 2014 मध्ये रॉबिन उथप्पा, 2015 मध्ये वॉर्नर, 2016 मध्ये विराट कोहली, 2017 मध्ये पुन्हा वॉर्नर, 2018 मध्ये केन विल्यमसन आणि 2019मध्ये पुन्हा वॉर्नर ऑरेंज कॅप मिळवण्यात यशस्वी ठरला. यानंतर, 2020 मध्ये केएल राहुलच्या डोक्यावर ऑरेंज कॅप सजली होती.