IPL 2022: मुंबई इंडियन्स दाखवणार हार्दिक पांड्याला दाखवणार रस्ता, लिलावात ‘या’ कारणामुळे राहू शकतो Unsold

हार्दिक पांड्याचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. मुंबई इंडियन्सकडून हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवला जाणे निश्चित मानले जात आहे. इतकंच नाही तर हार्दिक सारखा झंझावाती फलंदाज आणि अष्टपैलू लिलावात अनसोल्ड देखील राहण्याची शक्यता आहे.

हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 लिलावापूर्वी सर्व आठ फ्रँचायझींना रिटेन केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करायची आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आगामी हंगामासाठी कायम ठेवलेल्या खेळाडूंची पुष्टी करण्यासाठी मालकांना 30 नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे आणि यासाठी आता फक्त काही तास शिल्लक असताना याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ज्या खेळाडूंना त्यांच्या संघाद्वारे कायम ठेवले जाणार नाही आणि ते लिलाव पूलमध्ये दिसतील. हार्दिक पांड्याचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे. मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) हार्दिकला बाहेरचा रस्ता दाखवला जाणे निश्चित मानले जात आहे, कारण गेल्या मोसमातील त्याची कामगिरी फ्लॉप होती. याशिवाय सध्या तो गोलंदाजी करण्याच्या स्थितीत नाही आहे. त्यामुळे मुंबई फ्रँचायझी आता हार्दिकच्या बदलीच्या शोधात असेल. (IPL 2022 Retention: लिलावापूर्वी मुंबई, CSK, दिल्ली घेणार मोठा निर्णय; ‘या’ स्टार भारतीय खेळाडूंना दाखवणार बाहेरचा रस्ता)

आयपीएल 2022 मेगा लिलावाबाबत चर्चेचा बाजार तापला आहे. यामध्ये केएल राहुल, डेविड वॉर्नर, रविचंद्र अश्विन, क्रिस गेल यासह सर्वच खेळाडू किती कोटींमध्ये विकतील, याबाबत अटकळ बांधली जात आहे. पण दरम्यान, हार्दिक सारखा झंझावाती फलंदाज आणि अष्टपैलू लिलावात अनसोल्ड देखील राहण्याची शक्यता आहे. हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण यामागे एक खास कारण आहे. आयपीएलचे सामने मार्च-एप्रिलपर्यंतच सुरू होणार असले तरी तोपर्यंत त्याची फिटनेसची समस्या दूर होऊ शकते. हार्दिकला पूर्णपणे तंदुरुस्त होऊन पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करण्यासाठी आणखी काही काळ उलटणार आहे. मात्र त्याचा अलीकडचा फॉर्म आणि गोलंदाजी करण्यात असमर्थता फ्रँचायझी त्याच्यावर लिलावात बोली लावण्यापूर्वी नक्कीच विचार करण्यासाठी भाग पाडू शकते. याशिवाय हार्दिक देखील एक हंगामातून ब्रेक घेऊन आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करू शकतो.

हार्दिकबद्दल बोलायचे झाले तर तो आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळत आहे. तो संघाचा आघाडीचा फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही राहिला आहे. पंड्या त्याच्या झंझावाती फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण समस्या अशी आहे की तो गेल्या आयपीएलमध्ये फारसा खेळला नाही. याशिवाय त्याच्या तंदुरुस्तीमुळे त्याला गोलंदाजीही करण्यात आली नाही. टी-20 विश्वचषकत त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले पण कामगिरी काही खास नव्हती. त्यांनतर त्याला न्यूझीलंड मालिकेतूनही वगळण्यात आले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif