IPL 2022 Mega Auction: ईशान किशन समवेत ‘हे’ 5 खेळाडू आहेत RCB च्या निशाण्यावर, पण कोणाला मिळणार फ्रँचायझीची कमान?
या दरम्यान, संघाने रविवारी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आणि सांगितले की कोणते खेळाडू संघाचे कर्णधार होऊ शकतात. यामध्ये युवा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनचेही नाव आहे. आरसीबी टीव्हीनुसार सर्व संघ देशी किंवा परदेशी यांच्यापैकी कोणावर बोली लावेल हे सांगितले आहे.
IPL 2022 Mega Auction: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 15 च्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव येत्या 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगलोर येथे आयोजित केला जाणार आहे. आयपीएलच्या लिलावासाठी (IPL Auction) आता फक्त काही तास शिल्लक असताना आता सर्व फ्रँचायझी आपल्या अंतिम तयारीत असतील. यावेळी 10 संघ टी-20 लीगमध्ये उतरणार आहेत. विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (Royal Challengers Bangalore) कर्णधार म्हणून पायउतार झालं आहे. अशा परिस्थितीत संघ नवीन कर्णधाराच्या शोधात व्यस्त असून त्यांचा शोध आता काही दिवसातच संपुष्टात येणार आहे. या दरम्यान, संघाने रविवारी एक व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आणि सांगितले की कोणते खेळाडू संघाचे कर्णधार होऊ शकतात. यामध्ये युवा यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) चेही नाव आहे.
आरसीबी टीव्हीनुसार सर्व संघ देशी किंवा परदेशी यांच्यापैकी कोणावर बोली लावेल हे सांगितले आहे. व्हिडिओमध्ये 5 खेळाडूंच्या नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. सर्वप्रथम श्रेयस अय्यरबद्दल बोलले गेले. वयाच्या 23 व्या वर्षी अय्यर प्रथम दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार बनला आयपीएल 2019 मध्ये त्याने संघाला टॉप-4 मध्ये स्थान मिळवून दिले होते. त्यानंतर 2020 मध्ये संघ उपविजेता ठरला. मात्र, आयपीएल 2021 पूर्वीच तो जखमी झाला, ज्यानंतर संघाने रिषभ पंतला संघाचा नवा कर्णधार बनवले. फ्रँचायझीने पंतला कर्णधार म्हणून कायम ठेवल्याने अय्यरने संघ सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर यामध्ये वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरच्या नावाचाही समावेश आहे. होल्डरने युवा वयात विंडीज संघाची कमान हाती घेतली. अष्टपैलू म्हणून त्याची कामगिरी चांगली झाली आहे.
इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार इयन मॉर्गनचेही नाव आरसीबीच्या कर्णधाराच्या शर्यतीत आहे. मॉर्गनच्या नेतृत्वात इंग्लंड 2019 पहिल्यांदा विश्वविजेता बनला. गेल्या मोसमात तो कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता आणि त्याने संघाचे फायनलपर्यंत नेतृत्व केले होते. मात्र, संघाला चेन्नई सुपर किंग्सकडून पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, ईशान किशन गेल्या मोसमात मुंबई इंडियन्सचा भाग होता. त्याने अंडर-19 संघाचे नेतृत्व केले होते. तो त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच डेविड वॉर्नरचे नाव पाचवे कर्णधार म्हणून समोर आले. वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादला चॅम्पियन बनवला आहे. तर वॉर्नरच्या नावावर टी-20 मध्ये 10 हजारांहून अधिक धावा आहेत. अशा स्थितीत आरसीबीचा संघ त्याच्यावर बोली लावू शकतो. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला संघाने कायम ठेवले असून तो देखील कर्णधार बनण्याच्या शर्यतीत आहे.