IPL 2022 Auction: आयपीएल लिलावात ‘बेबी एबी’ देवाल्ड ब्रेव्हिस आणि यश धुल यांचा समावेश; 42 वर्षीय ताहिर सर्वात वयस्कर, 17 वर्षीय नूर अहमद सर्वात युवा खेळाडू

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या सीजनसाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. तब्ब्ल 590 खेळाडूंवर आता बोली लावली जाणार आहे. वेस्ट इंडिजमधील U19 विश्वचषक स्पर्धेत ठसा उमटवणारे युवा स्टार खेळाडू लिलावात आकर्षण असेल. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा 42 वर्षीय माजी फिरकीपटू इमरान ताहीर सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तसेच 17 वर्षीय नूर अहमद हा युवा खेळाडू आहे.

Imran Tahir (Photo Credit: Twitter)

IPL 2022 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या सीजनसाठी खेळाडूंची अंतिम यादी जाहीर झाली आहे. एक हजारपेक्षा अधिक खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली होती त्यापैकी 590 खेळाडूंवर आता बोली लावली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडूंसोबत देश-विदेशातील युवा खेळाडूंचा देखील लिलावाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. सध्या वेस्ट इंडिजमध्ये अंडर-19 वर्ल्ड कप (U19 World Cup) स्पर्धा खेळली जात असून यामध्ये युवा खेळाडूंनी आपला आपली चमक दाखवली आहे. वेस्ट इंडिजमधील U19 विश्वचषक स्पर्धेत ठसा उमटवणारे युवा स्टार खेळाडू लिलावात आकर्षण असेल. याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा 42 वर्षीय माजी फिरकीपटू इमरान ताहीर (Imran Tahir) सर्वात वयस्कर खेळाडू आहे. तसेच 17 वर्षीय नूर अहमद (Noor Ahmad) हा युवा खेळाडू आहे. (IPL 2022 Auction Players List: 2 कोटींच्या टॉप ब्रॅकेटमध्ये 6 विदेशी स्टार्ससह ‘हे’ आहेत 10 मार्की खेळाडू, पहा संपूर्ण लिस्ट)

अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेतील खेळाडूंबद्दल बोलायचे तर दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेव्हिसने (Dewald Brevis) देशांतर्गत तसेच अंडर-19 विश्वचषक स्पर्धेमध्ये ठसा उमटवला आहे. ‘बेबी एबी’ म्हणून ओळखला जाणाऱ्या ब्रेव्हिसची फलंदाजीची शैली दिग्गज एबी डिव्हिलियर्ससारखी आहे. ब्रेव्हिसची बेस प्राईस 20 लाख आहे. U19 विश्वचषक स्पर्धेत ब्रेव्हिस शानदार फॉर्ममध्ये होता, त्याने अवघ्या 5 सामन्यांमध्ये 368 धावा फटकावल्या होत्या - ज्यात 1 शतक आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या वर्षी खेळाच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर आयपीएल 2022 च्या लिलावाचा भाग नसलेल्या डिव्हिलियर्स सारख्याच शैलीसह 18 वर्षांचा युवा आकर्षणाचा केंद्र बनला आहे.

दरम्यान, भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार यश धुल देखील 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत लिलावाच्या शॉर्टलिस्ट खेळल्या खेळाडूंमध्ये आहे. धूलने विश्वचषकात कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यामुळे केवळ 2 सामने खेळले आहेत परंतु त्याने चमकदार चिन्हे दर्शवली आहेत. तर आपल्या अष्टपैलू क्षमतेने भारताच्या अंडर-19 संघासाठी ठसा उमटवणारा युवा गोलंदाज राजवर्धन हंगरगेकर लिलावात 30 लाख रुपयांत उपलब्ध आहे. दुसरीकडे, लिलावात उतरणारा अफगाणिस्तानचा अंडर-19 स्टार नूर अहमद सर्वात युवा खेळाडू ठरला. 17 वर्षीय नूर अहमदसाठी फ्रँचायझींमध्ये निश्चितपणे जोरदार लढाई होईल. या युवा गोलंदाजाकडे बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्स आणि पाकिस्तान सुपर लीगमधील कराची किंग्जसाठी फ्रँचायझी क्रिकेटचा अनुभव आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now