IPL 2022 Auction Players Base Price: ‘या’ भारतीय 17 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी, लिलावात आजमावणार नशीब
मेगा लिलावापूर्वी आयपीएलमध्ये यावर्षासाठी नोंदणी करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली असून भारताचे खेळाडू, ज्यांची मूळ किंमत (बेस प्राईस) यंदाच्या आयपीएलमध्ये 2 कोटी रुपये आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.
IPL 2022 Auction Players Base Price: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आगामी 15 व्या हंगामाच्या मेगा लिलावासाठी 1200 हून अधिक खेळाडूंनी नोंदणी केली आहे. आयपीएल (IPL) 2022 च्या मेगा लिलावात डेविड वॉर्नर, श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांच्यापासून अनेक मोठी नावे झळकणार आहेत. या वर्षांपासून 10 फ्रँचायझी संघात जेतेपदासाठी चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. तर या संघांनी केवळ 33 खेळाडूंना कायम ठेवले आहे. अशा स्थितीत शेकडो खेळाडूंचा लिलाव करावा होणार आहे. मेगा लिलावापूर्वी आयपीएलमध्ये यावर्षासाठी नोंदणी करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली असून भारताचे खेळाडू, ज्यांची मूळ किंमत (बेस प्राईस) यंदाच्या आयपीएलमध्ये 2 कोटी रुपये आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. (IPL 2022 खेळाडूंच्या लिलावासाठी 1214 खेळाडूंनी केली नोंदणी)
वृत्तानुसार, भारतातील 17 खेळाडूंची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. म्हणजेच या खेळाडूंवर 2 कोटींच्या पुढे बोली सुरु होईल. याशिवाय असे काही खेळाडू आहेत ज्यांना त्यांच्या मूळ किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. 2 कोटींच्या मूळ किमतीत असलेल्या भारतीय खेळाडूंमध्ये 6 फलंदाज, दोन विकेटकीपर-फलंदाज, 3 फिरकीपटू आणि 6 वेगवान गोलंदाज आहेत. यातील जवळपास सर्वच खेळाडूंवर बोली लावली जाईल असे अपेक्षित आहे. लिलावात उतरलेल्या खेळाडूंच्या 2 कोटींची मूळ किंमत असलेल्या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन, श्रेयस अय्यर, रॉबिन उथप्पा, देवदत्त पडिक्कल, सुरेश रैना आणि अंबाती रायडू यांच्या नावांचा समावेश आहे, तर ईशान किशन आणि दिनेश कार्तिक यांचा यष्टीरक्षक म्हणून समावेश आहे. तसेच आर अश्विन, युजवेंद्र चहल आणि कृणाल पंड्या यांची नावे फिरकीपटूंच्या यादीत आहेत. अखेरीस दीपक चाहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांची मूळ किंमत दोन कोटी रुपये आहे.
दुसरीकडे, आयपीएल 2022 लिलावासाठी तब्ब्ल 61 कॅप्ड भारतीय खेळाडूंनी नोंदणी केली आहे, तर 143 अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहेत जे यापूर्वी देखील स्पर्धा खेळला आहेत. याशिवाय 692 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी देखील नोंदणी केली आहे, ज्यांनी आतापर्यंत देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. बीसीसीआय फक्त अशा खेळाडूंना संधी देते ज्यांनी किमान दोन प्रथम श्रेणी किंवा तीन मर्यादित षटकांचे सामने खेळले आहेत.