IPL 2021: मुंबई इंडियन्स विरोधात SRH कडून Kane Williamson करणार कमबॅक? दुखापतीवर फलंदाजाने दिला मोठा अपडेट
आयपीएल 2021 मध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध आगामी सामन्यापूर्वी विल्यमसनच्या निवडीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट देत सनरायझर्स हैदराबादने चाहत्यांमधील शंका दूर केली आहे.
MI vs SRH IPL 2021: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 मध्ये सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) भयानक सुरुवात झाली. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वातील संघ लीगच्या सुरुवातीच्या टप्प्यात एकही विजय मिळवू शकला नाही. सनरायझर्स खेळाडू आणि संघ व्यवस्थापनाला टीकेला सामोरे जावे लागत असताना चाहत्यांनी आयपीएलच्या (IPL) मागील दोन सामन्यांमध्ये केन विल्यमसनच्या (Kane Williamson) प्लेइंग इलेव्हनमधील अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यादरम्यान, कोपऱ्याच्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या पहिला दोन सामन्यातून गायब असणाऱ्या विल्यमसनने दुखापतीतून मोठा अपडेट दिला आहे. आयपीएल 2021 मध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) आगामी सामन्यापूर्वी विल्यमसनच्या निवडीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट देत सनरायझर्स हैदराबादने चाहत्यांमधील शंका दूर केली आहे. (IPL 2021 Points Table Updated: CSK संघाच्या पहिल्या आयपीएल विजयानंतर गुणतालिकेत झाला मोठा बदल)
SRH सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हैदराबादच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्याच्या आदल्या दिवशी विल्यमसनने दुखापतीबाबतचे अपडेट (Kane Williamson Injury Update) शेअर केले आहेत. “रिकव्हरी खरोखरच चांगली चालली आहे आणि शक्य तितक्या लवकर मुक्त होण्याकडे लक्ष केंद्रित आहे, आणि आम्ही खरोखरच ट्रक घेत आहोत आणि आठवड्याभारत फिट व तयार होण्यासाठी आशावादी आहे,” व्हिडिओमध्ये विल्यमसनला बोलताना ऐकले जाऊ शकते. "सराव आणि पुनर्वसन व अन्य प्रकारच्या गोष्टींमध्ये थोडे संतुलन राहिले. परंतु, बर्याच प्रमाणात प्रगती खरोखरच चांगली आहे. त्यामुळे, लवकरच पूर्ण फिटनेसच्या जवळ असण्याची आशा आहे,” विल्यमसनने पुढे म्हटले. विल्यमसन हा आधुनिक युगातील खेळाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ओळखला जातो.
विल्यमसनने मागील वर्षी युएई येथे आयोजित झालेल्या मोसमात 2016 चॅम्पियन्स संघाच्या क्रिकेटच्या सर्वात मोठ्या घरगुती लीगच्या प्लेऑफ टप्प्यात नेण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. अशास्थितीत, आयपीएलच्या 2021 च्या हंगामासाठी न्यूझीलंडचा कर्णधाराला हैदराबादस्थित फ्रँचायझीने संघात कायम ठेवले होते. युएईमध्ये खेळल्या गेलेल्या आयपीएल 2020 मध्ये विल्यमसनने हैदराबादकडून 11 डावात 317 धावा केल्या होत्या. सनरायझर्सच्या मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 30 वर्षीय विल्यमसनला डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली होती आणि ज्यामुळे आयपीएलपूर्वी मार्च महिन्यात बांग्लादेशविरुद्ध घरच्या मैदानावरील एकदिवसीय मालिकेमधून त्याला वगळण्यात आले होते. दरम्यान, संघाने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यांमध्ये मधल्या फळीतील फलंदाजांची खराब कामगिरी सनरायझर्स हैदराबादची सर्वात मोठी कमजोरी असल्याचं सिद्ध झालं आहे.