IPL 2021 Suspended: ‘हा आता विनोद नाही’, आयपीएल स्थगित झाल्यावर ‘Mr IPL’ सुरेश रैनाने दिली मोठा प्रतिक्रिया, पहा काय म्हणाला

चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू सुरेश रैना मंगळवारी आयपीएल निलंबनावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या खेळाडूंपैकी एक ठरला. आयपीएल पुढे ढकलण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाचा सुरेश रैनाने समर्थन केले आणि आता हा विनोद राहिलेला नाही असे म्हटले.

चेन्नई सुपर किंग्सचा सुरेश रैना (Photo Credit: Twitter/@IPL)

IPL 2021 Suspended: आयपीएलच्या (IPL) बायो-बबलमध्ये कोविड-19 (COVID-19) प्रोटोकॉलचा भंग केल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मंगळवारी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले. तब्बल चार फ्रेंचायझींनी कोरोना व्हायरसची (Coronavirus) पॉसिटीव्ह प्रकरणाची नोंद केल्यावर बीसीसीआयला हा निर्णय घेण्यास भाग पाडले. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) खेळाडू सुरेश रैना (Suresh Raina) मंगळवारी आयपीएल निलंबनावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या खेळाडूंपैकी एक ठरला. आयपीएल पुढे ढकलण्याच्या बीसीसीआयच्या (BCCI) निर्णयाचा सुरेश रैनाने समर्थन केले आणि आता हा विनोद राहिलेला नाही असे म्हटले. कोरोनामुळे बहुतांश शहरांमध्ये टाळेबंदी करण्यात आली आहे. यादरम्यान, सीएसकेचा दिग्गज आणि ‘Mr IPL’ रैनाने ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली. (IPL 2021 Suspended: आयपीएलमधून मायदेशी परतण्याच्या कवायतीत मालदीव येथे जाणार ऑस्ट्रेलियन खेळाडू, पण Pat Cummins संभ्रमात)

ट्वीट पोस्टमध्ये सुरेश रैनाने लिहिले की, “हा आता विनोद नाही! अनेक जीव धोक्यात आले आणि आयुष्यात कधी असहाय्य वाटले नाही. आपल्याला कितीही मदत करायची असली तरी आपल्याकडे संसाधने अक्षरशः संपत आहेत. या देशातील प्रत्येक व्यक्ती जीव वाचवण्यासाठी एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी सलामचा पात्र आहे! #WeCandoit.” यापूर्वी मंगळवारी सनरायझर्स हैदराबादचा विकेटकीपर-फलंदाज रिद्धिमान साहाची कोविड-19 टेस्ट पॉसिटीव्ह आल्याचं फ्रँचायझीने जाहीर केलं होतं. “होय, रिद्धिमान साहाचा कोरोना व्हायरस अहवाल सकारात्मक आला आहे. आमची संपूर्ण कार्यसंघ आता आयसोलेशनमध्ये आहे आणि इतर कोणतेही सकारात्मक अहवाल नाहीत, बाकीचे सर्व नकारात्मक आहेत,” संघ व्यवस्थापना सदस्याने म्हटले.

वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर हे दोन केकेआर खेळाड आणि चेन्नई सुपर किंग्जच्या पथकाच्या दोन सदस्यांना कोविड-19 ची सकारत्मक लागण झाल्यावर ही संपूर्ण घटना घडली. सीएसकेचे लक्ष्मीपती बालाजी, माइक हसी यांच्यासह चार जण आयपीएलच्या बायो-बबलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आयपीएल संघांमधील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लीग स्थगित करण्याचा निर्णय आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिल आणि बीसीसीआयच्या आपत्कालीन बैठकीत घेण्यात आला. यंदाची लीग 9 एप्रिलपासून सुरू झाली होती.