IPL 2021, SRH vs MI: ‘खुद तो डूबे हैं सनम, तुमको भी...’ सनरायझर्सवर विजय मिळवूनही मुंबई इंडियन्स पराभूत, KKR ला प्लेऑफचं तिकीट

मात्र आपल्या अंतिम सामन्यात विजय मिळवूनही मुंबई प्लेऑफ फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरली आणि कोलकाता नाईट रायडर्सने प्लेऑफसाठी चौथे स्थान काबीज केले. प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडलेल्या हैदराबादने मुंबईचाही खेळ खराब केला.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

IPL 2021, SRH vs MI: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 14 च्या आपल्या अंतिम लीग स्टेज सामन्यात गतविजेता मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सनरायझर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) दणकेबाज विजय मिळवला. मात्र आपल्या अंतिम सामन्यात विजय मिळवूनही मुंबई प्लेऑफ फेरीत प्रवेश करण्यात अपयशी ठरली आणि कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) प्लेऑफसाठी चौथे स्थान काबीज केले. प्लेऑफ शर्यतीतून बाहेर पडलेल्या हैदराबादने मुंबईचाही खेळ खराब केला. मुंबईने पहिले फलंदाजी करून ईशान किशन (Ishan Kishan) आणि सूर्यकुमार यादव यांच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या जोरावर 235 धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात मनीष पांडेच्या नेतृत्वात हैदराबाद 20 ओव्हरमध्ये 193/8 धावाच करू शकली. परिणामी त्यांना 42 धावांनी पराभवाचे तोंड पाहावे लागले. मुंबई गोलंदाजांनी हैदराबादला 65 धावांवर रोखणे गरजेचे होते पण तसे झाले नाही त्यामुळे सकारात्मक नेट रनरेटसह केकेआरने प्लेऑफचे तिकीट पटकावले आहे. केकेआरने 14 सामन्यात सात सामन्यात विजय मिळवून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. (IPL 2021, RCB vs DC: अंतिम चेंडूत KS Bharat ने खेचला उत्तुंग षटकार, आरसीबीच्या पारड्यात पाडला 100 वा विजय; बेंगलोरची दिल्लीवर 7 विकेटने मात)

हैदराबादसाठी कर्णधार मनीष पांडेने सर्वाधिक 69 धावांची नाबाद खेळी केली पण संघाला विजयीरेष ओलांडून देण्यास तो पुरेशी ठरली नाही. विशेष म्हणजे पांडेने पहिल्यांदा सनरायझर्स कर्णधार म्हणून आयपीएल अर्धशतक झळकावले आहे. पांडेला वगळता जेसन रॉयने 34 धावा, अभिषेक शर्माने 33 आणि प्रियम गर्गने 29 धावांचे योगदान दिले. जेसन रॉयल आणि अभिषेक शर्माने संघाला शानदार सुरुवात करून दिले सलामीसाठी 64 धावांची भागीदारी केली. पण त्यानंतर संघाने नियमित अंतराने चार विकेट गमावल्यावर मुंबईने आघाडी घेतली. तथापि पांडे आणि अब्दुल समदच्या अर्धशतकी भागीदारीने संघाचा डाव सावरला. जसप्रीत बुमराहने गर्गला शून्यावर पोलार्डकडे झेलबाद करून मुंबईला पाचवे यश मिळवून दिले. कुल्टर नाईलने मुंबईला 6 वी विकेट मिळवून दिली आणि जेसन होल्डरला एका धावेवर माघारी धाडले.

या दरम्यान तग धरून खेळणाऱ्या मनीषने आपले अर्धशतक पूर्ण केले. मुंबई इंडियन्स हैदराबादच्या धावगतीवर वेसण घालण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांनी प्लेऑफ स्थान गमावले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स, आरसीबी आणि केकेआर संघ विजेतेपदासाठी लढा देतील



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif