IPL 2021 Qualifier 2, KKR vs DC: राहुल त्रिपाठीचा विजयी षटकार, कोलकाता नाईट रायडर्सचा धमाका, दिल्लीवर रोमांचक विजयासह फायनलमध्ये दिमाखदार एन्ट्री
शारजाह येथे रंगलेल्या रंगतदार क्वालिफायर-2 मध्ये इयन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर 3 विकेटने धमाकेदार विजय मिळवून यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये धडक मारली आहे. मोक्याच्या क्षणी राहुल त्रिपाठीने विजयी षटकार मारून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. आता केकेआरचा सामना तीन वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सशी 15 ऑक्टोबर रोजी होईल.
IPL 2021, KKR vs DC Qualifier 2: शारजाह येथे रंगलेल्या रंगतदार क्वालिफायर-2 मध्ये इयन मॉर्गनच्या कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) 3 विकेटने धमाकेदार विजय मिळवून यंदाच्या आयपीएल फायनलमध्ये धडक मारली आहे. मोक्याच्या क्षणी राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) विजयी षटकार मारून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. आता केकेआरचा सामना तीन वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सशी (Chennai Super Kings) 15 ऑक्टोबर रोजी होईल. केकेआरने (KKR) टॉस जाणून दिल्लीला पहिले फलंदाजीला बोलावले. प्रत्युत्तरात दिल्ली फलंदाज बॅटने प्रभावी हल्ला करण्यात अपयशी ठरल्यामुळे संघ 135 धावाच करू शकला. अशा परिस्थितीत कोलकाताने 19.5 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून लक्ष्य साध्य केले आणि दिल्लीचे सलग दुसरे आयपीएल फायनल गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. केकेआरच्या विजयात व्यकटेश अय्यर 55 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच शुभमन गिल 46 चेंडूत 46 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, दिल्लीसाठी कगिसो रबाडा आणि एनरिच नॉर्टजेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर आवेश खान, आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी एक विकेट घेतली. (IPL 2021 मध्ये घडली चकित करणारी घटना, एकाच चेंडूवर पकडले दोन कॅच पण फलंदाज झाला नाही OUT; पहा Qualifier-2 मधील आश्चर्यकारक दृश्य)
दिल्लीने दिलेल्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकातासाठी व्यंकटेश अय्यर आणि शुभमन गिल यांनी जबरदस्त सुरुवात केली. दिल्लीचे गोलंदाज विकेटच्या शोधात असताना कोलकाताच्या या सलामी जोडीने जोरदार हल्ला चढवला आणि संघाचा विजय निश्चित केला. अय्यरने सुरुवातीपासून आपला आक्रमक पवित्रा घेत फलंदाजी केली. यादरम्यान केकेआरचा सलामीवीर अय्यरने दमदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं पण 55 धावांवर रबाडाच्या चेंडूवर तो स्टिव्ह स्मिथच्या हाती झेलबाद झाला. अय्यर आणि गिलने सलामीसाठी 96 धावांची भागीदारी केली. यानंतर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना नॉर्टजेने राणाला 12 चेंडूत 13 धावांवर शिमरॉन हेटमायरकडे कॅच आऊट करत संघाला दुसरे यश मिळवून दिले. मोक्याच्या क्षणी आवेश खानच्या गोलंदाजीवर केकेआरचा सलामीवीर शुभमन गिल 46 धावा करून माघारी परतला. निर्णायक क्षणी नॉर्टजेने मॉर्गनची विकेट घेत केकेआरला मोठा धक्का दिला. त्यानंतर अंतिम षटकात आर अश्विनने सलग दोन चेंडूत शाकिब अल हसन आणि सुनील नारायणला बाद करून संघावरील दबावात भर घातली. पण पाचव्या चेंडूवर त्रिपाठीने षटकार खेचला आणि दिल्लीला पराभवाचा धक्का दिला.
अशाप्रकारे कोलकाता नाईट रायडर्स संघाने सलग तिसऱ्या आयपीएल फायनलचे तिकीट मिळवले. यापूर्वी संघाने माजी कर्णधार गौतम गंभीरच्या नेतृत्वात 2012 आणि 2014 अंतिम फेरीत प्रवेश केला होता. उल्लेखनीय म्हणजे दोन्ही वेळी त्यांनी जेतेपद पटकावले होते. तसेच 2012 आयपीएल फायनल सामन्यात चेन्नईवर 5 गडी राखून सामना जिंकला होता. दरम्यान आयपीएल फायनलमध्ये चेन्नई आणि कोलकाता आता दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)