IPL 2021: हर्षल पटेलची रेकॉर्ड-ब्रेक गोलंदाजी; बनला आयपीएलचा नंबर 1 भारतीय गोलंदाज, आता सर्वात मोठ्या विक्रमापासून 4 पाऊल दूर

हैदराबादचा फलंदाज रिद्धिमान साहाला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवताच तो आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे.

हर्षल पटेल (Photo Credit: PTI)

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात आज इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चा 52 वा सामना सुरू आहे. अबू धाबीच्या (Abu Dhabi) शेख जायद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने (Harshal Patel) एक विशेष रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. हैदराबादचा फलंदाज रिद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) पॅव्हिलियनचा रस्ता दाखवताच तो आयपीएलच्या (IPL) एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. हर्षलने भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) या प्रकरणात मागे सोडले आहे. बुमराहने गेल्या वर्षी यूएईमध्ये (UAE) आयोजित आयपीएलच्या 13 व्या सत्रात एकूण 27 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर बुमराहच्या शानदार गोलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. आजच्या सामन्यात हर्षलने पहिले हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनला (Kane Williamson) क्लीन बोल्ड केले. विल्यमसन मात्र चांगल्या सुरवातीचे मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरला आणि हर्षलने त्याला बोल्ड केले. त्याने 29 चेंडूंचा सामना करताना चार चौकार लगावले. (IPL 2021, RCB vs SRH: बेंगलोर गोलंदाजांचा भेदक मारा; हैदराबादची 141/7 धावांपर्यंत मजल, Jason Roy चं अर्धशतक हुकलं)

हैदराबादविरुद्ध पटेल आरसीबीचा उत्कृष्ट गोलंदाज ठरला आणि इंडियन प्रीमियर लीग 2021 मध्ये 29 विकेट पूर्ण करण्यासाठी आणि जसप्रीत बुमराहचा आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट मोडण्यासाठी एकूण तीन विकेट घेतल्या. हर्षलने केन विल्यमसन (31), रिद्धिमान साहा (10) आणि जेसन होल्डर (16) यांना बाद करत विशेष यादीत आघाडी घेतली.  पटेल आणि बुमराह नंतर या यादीत भुवनेश्वर कुमारचे नाव आहे ज्याने 2017 आयपीएलमध्ये 26 विकेट्स घेतल्या. 2013 मध्ये हरभजन सिंहने 24 विकेट्स घेतल्या होत्या. दरम्यान, हर्षलने यंदाच्या हंगामात याआधी हॅटट्रिक आणि पाच विकेट्स मिळवल्या आहेत, जे मोसमात इतर कोणत्याही गोलंदाजाने साध्य केले नाहीत.

ड्वेन ब्रावोचा विक्रम मोडण्यापासून 4 विकेट दूर

याशिवाय आता हर्षल पटेलची नजर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमावर आहे. आयपीएल हंगामात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम चेन्नई सुपर किंग्जचा कॅरेबियन अष्टपैलू ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे, ज्याने आयपीएल 2013 मध्ये 18 सामन्यात 32 विकेट्स घेतल्या. गेल्या 8 वर्षांत एकही गोलंदाज हा रेकॉर्ड मोडण्यात यशस्वी ठरला नाही. मात्र या दरम्यान ज्या लयमध्ये हर्षल दिसत आहे, भारतीय चाहत्यांना आशा आहे की पटेल लवकरच आणखी 4 विकेट घेऊन हा विक्रम आपल्या नावे करेल.