IPL 2021: ‘संघनिवडीवेळी खेळाडू म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य व विश्वास दिला जातो’, KKR च्या कामगिरीवर नाराज Brendon McCullum यांनी दिले बदलाचे संकेत

केकेआरचे प्रशिक्षक ब्रॅंडन मॅक्युलम यांनी आपल्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांवर जोरदार टीका केली आणि म्हटले की इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सध्याच्या हंगामात ते आपला हेतू दर्शवत नाही. शिवाय पुढील सामन्यांमध्ये संघात बदल करण्याचे संकेत देखील दिले.

इयन मॉर्गन आणि ब्रेंडन मॅक्युलम (Photo Credit: Instagram)

IPL 2021: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) 3 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध लढतीपूर्वी आपला प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याची अपेक्षा आहे. केकेआरचे (KKR) प्रशिक्षक ब्रॅंडन मॅक्युलम (Brendon McCullum) यांनी आपल्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांवर जोरदार टीका केली आणि म्हटले की इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) सध्याच्या हंगामात ते आपला हेतू दर्शवत नाही आणि आक्रमकतेची कमी आहे जी संघात निवड झाल्यावर त्यांच्याकडून अपेक्षित आहे. मॅक्युलमने कुणाचेही नाव घेतले नाही परंतु फॉर्मामध्ये नसलेल्या अशा खेळाडूंमध्ये भारताचा उदयोन्मुख फलंदाज शुभमन गिलचा समावेश आहे. शुभमनने आतापर्यंत सात सामन्यांमध्ये केवळ 132 धावा केल्या आहेत. तसेच पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) फलंदाजीचं कौतुक करताना बॅटिंग कशी करावी हे त्याने दाखवलं असंही मॅक्युलम यांनी म्हटलं. शिवाय पुढील सामन्यांमध्ये संघात बदल करण्याचे संकेत देखील दिले. (DC vs KKR IPL 2021 Match 25: Prithvi Shaw याची जबरा फलंदाजी, दिल्लीकडून कोलकाताचा 7 विकेटने दारुण पराभव)

गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हंगामातील पाचव्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी लीगमध्ये कमबॅकसाठी आपल्याला नव्या चेहऱ्यांची गरज असल्याचे जाहीर केलं. “तुम्ही प्रत्येक चेंडूला चौकार आणि षटकार ठोकत नाही तर जेव्हा तुम्हाला सर्वप्रकारची सूट आणि स्वातंत्र्य दिलं असल्यास तो तुमचा हेतू असू शकतो. शॉट्स न खेळता धावा करणे अवघड आहे आणि दुर्दैवाने, आम्ही आज रात्री पुरेसे शॉट खेळू शकलो नाही आणि येत्या सामन्यांमध्ये संघात नक्कीच काही बदल करण्याची गरज आहे.” दिल्लीचा युवा ओपनर पृथ्वीच्या खेळीचं कौतुक कारण मॅक्युलमने म्हटले, “पृथ्वी शॉने आम्हाला कसे खेळायचे आहे याचा परफेक्ट टीम प्ले दाखवला. आम्हाला कदाचित नवीन कर्मचारी आणावे लागतील जे आशेने प्रयत्न करतील आणि खेळ आणखी थोडा पुढे नेतील.”

केकेआरसाठी शुबमन गिलने फटकेबाजी करत 38 चेंडूत 43 धावा फटकावल्या पण धावगतीचा वेग वाढवण्यासाठी तो मोठे शॉट्स खेळू शकला नाही. आंद्रे रसेलच्या 27 चेंडूत नाबाद 45 धावांनी कोचला खूष केले ज्यामुळे संघाने 154 धावांची सन्मानजनक धावसंख्या गाठली. केकेआरने दिल्लीला 154 धावांचे लक्ष्य दिले जे त्यांनी सहज गाठले. पृथ्वी शॉने शिवम मावीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 6 चौकार खेचले आणि सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा वापरला.