IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा दिमाखदार विजय, SRH ला 8 विकेटने धूळ चारून प्लेऑफच्या दिशेने उचलले आणखी एक पाऊल

दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात विजयाने केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दुबई येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात गोलंदाजानंतर दिल्लीने फलंदाजांच्या बळावर 8 विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे. हैदराबादने दिलेल्या 135 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीने 17.5 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून प्लेऑफच्या दिशेने आगेकूच सुरूच ठेवली आहे.

दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 च्या 33 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) दुसऱ्या पर्वाची सुरुवात विजयाने केली. सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध दुबई (Dubai) येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात गोलंदाजानंतर दिल्लीने फलंदाजांच्या बळावर 8 विकेटने दणदणीत विजय मिळवला आहे. शिखर धवनने (Shikhar Dhawan) 42 धावा केल्या. तर पृथ्वी शॉने 21 आणि श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) सर्वाधिक 47 धावांचे नाबाद योगदान दिले. तसेच रिषभ पंत (Rishabh Pant) 35 धावा करून नाबाद परतला. हैदराबादने दिलेल्या 135 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात दिल्लीने 17.5 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून प्लेऑफच्या दिशेने आगेकूच सुरूच ठेवली आहे. या विजयासह दिल्ली कॅपिटल्स आता आयपीएल गुणतालिकेत नंबर एक संघ बनला आहे तर हैदराबाद तळाशी कायम आहेत. दुसरीकडे, केन विल्यम्सनच्या हैदराबादसाठी आजच्या सामन्यात फलंदाजांनंतर गोलंदाजांनीही निराशा केली. खलील अहमद आणि राशिद खान यांना वगळता अन्य स्टार गोलंदाज अपयशी ठरले.

हैदराबादने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीची सुरुवात चांगली झाली नाही. खालील अहमदने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये पृथ्वी शॉला माघारी पाठवले. त्यानंतर राशिदने शिखर धवन 42 धावांवर बाद केले. तथापि यांनतर श्रेयस अय्यरने कर्णधार पंतसोबत संघाला विजयीरेष ओलांडून दिली. या सामन्यात हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र खेळाडू दिल्लीच्या भेदक गोलंदाजीपुढे हतबल दिसले. हैदराबादकडून अब्दुल समदने सर्वाधिक 28 धावा केल्या. तसेच राशिदने 22 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त अन्य खेळाडूंना 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. दिल्लीकडून कगिसो रबाडाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच एनरिच नॉर्टजे आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. डेविड वॉर्नर आणि रिद्धिमान साहा सलामीला उतरले. मात्र, वॉर्नरला पहिल्याच ओव्हरमध्ये शून्यावर नॉर्टजेने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर साहाने कर्णधार विलियम्सनसह डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण रबाडाने 5 व्या ओव्हर18 धावांवर शिखर धवनकडे साहाला झेलबाद केले. अशाप्रकारे हैदराबादने पॉवर-प्लेमध्ये दोन्ही सलामीवीर गमावले. विलियम्सनला मनिष पांडेने चांगली साथ दिली होती. या दोघांनी 31 धावांची भागीदारी केली. पण 10 व्या षटकात पटेलने विलियम्सनला 18 धावांवर आणि 11 व्या षटकात मनिषला 19 धावांवर रबाडाने माघारी धाडले. नॉर्टजेने नंतर केदार जाधवला केवळ 3 धावांवर माघारी धाडलं.

त्यांनतर आलेल्या जेसन होल्डरलाही फारसा प्रभाव पाडता आला नाही. होल्डर अक्षरच्या फिरकीत अडकला आणि 10 धावा करुन पृथ्वी शॉकडे झेलबाद झाला. पाठोपाठ रबाडाने 28 धावा करणाऱ्या युवा समदला माघारी धाडले. तर अखेरच्या षटकात राशिद खान 19 चेंडूत 22 धावा करुन धावबाद झाला. अखेरच्या चेंडूवर संदीप शर्माही धावबाद झाला.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now