IPL 2021: राजस्थानचा गोलंदाज चेतन सकारियाने महेंद्रसिंह धोनीचे मानले आभार, सोशल मीडियावर केली 'अशी' पोस्ट
मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळण्यात आलेल्या या सामन्यात विजय मिळवून चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर, राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर घसरला आहे.
राजस्थान रॉयल्स विरुद्ध (Rajasthan Royals) सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) दमदारी कामगिरी दाखवत 45 धावांनी विजय मिळवला आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळण्यात आलेल्या या सामन्यात विजय मिळवून चेन्नईच्या संघाने आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर, राजस्थानचा संघ सहाव्या स्थानावर घसरला आहे. या सामन्यात राजस्थानच्या संघाने पराभवाचे तोंड पाहावे लागले असले तरी, त्यांचा युवा गोलंदाज चेतन सकारियाने (Chetan Sakariya) अनेकांची मन जिंकली आहेत. चेतनने 4 षटकात 36 धावा देऊन 3 महत्वाचे विकेट्स पटकावले. यात चेन्नईचे कर्णधार महेंद्र धोनीचाही (Mahendra Singh Dhoni) समावेश आहे. दरम्यान, धोनीचा विकेट घेतल्यानंतर चेतन मैदानातच आनंद व्यक्त करताना दिसला आहे.
भारतीय क्रिकेटचा एक महान आणि दिग्गज खेळाडू असलेल्या एमएस धोनीची विकेट कोणत्याही युवा गोलंदाजासाठी अधिक खास असते. धोनीला 18 धावांवर पॅव्हेलियनचा मार्ग दाखविताना चेतन सकारियासाठीही हा एक विशेष क्षण होता. सामना संपल्यानंतर चेतनने धोनीची भेट घेतली. त्यानंतर इंस्टाग्रावर एक फोटो शेअर केला. या फोटोला कॅप्शन देत सकारियाने लिहले आहे की, "मी तुम्हाला लहानपणापासूनच माझा आदर्श मानतो आणि आज मला तुमच्या बरोबर खेळण्याचा बहुमान मिळाला. हा माझ्या आयुष्यातील सर्वात चांगला क्षण आहे. मी हा क्षण आजीवन जगणार आहे. कोणताही खेळाडू तुमच्यासारखा बनू शकत नाही मला तुमचे आभार मानायचे आहे कारण आपण सर्वांना प्रेरित केले आहे". हे देखील वाचा- IPL 2021: दिल्ली कॅपिटल्सचा संघ आज मुंबई इंडियन्सला भिडणार; शिखर धवनचा संघाला मोलाचा सल्ला
इन्स्टाग्राम पोस्ट-
चेतनने राजस्थान रॉयल्सकडून आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. ज्यात 6 विकेट्स घेतल्या आहेत. राजस्थानच्या आगामी सामन्यात चेतनची जादू दिसण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना 22 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी होणार आहे.