IPL 2021: पंजाब किंग्जला मोठा धक्का, सुपरस्टार फलंदाज Chris Gayle ‘या’ कारणामुळे स्पर्धेतून पडला बाहेर
आयपीएल 2021 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या पंजाब किंग्जला मोठा धक्का बसला आहे. टीमचा सुपरस्टार स्फोटक फलंदाज क्रिस गेलने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, 1 ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यापूर्वी विंडीज दिग्गजाने हा निर्णय घेतला आहे. गेलने या निर्णयाचे श्रेय सतत बायो-बबलमध्ये राहिल्यामुळे झालेल्या थकव्याला दिले आहे.
आयपीएल (IPL) 2021 च्या प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी धडपडणाऱ्या पंजाब किंग्जला (Punjab Kings) मोठा धक्का बसला आहे. टीमचा सुपरस्टार स्फोटक फलंदाज क्रिस गेलने (Chris Gayle) स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, 1 ऑक्टोबर रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी विंडीज दिग्गजाने हा निर्णय घेतला आहे. गेलने यामागचे कारण सतत बायो-बबलमध्ये राहिल्यामुळे झालेल्या थकव्याला दिले आहे. पंजाब किंग्ज (PBKS) ने गेलच्या वतीने निवेदन जारी करून या निर्णयाची माहिती दिली. गेलने या मोसमात पंजाबसाठी 10 सामने खेळले. सध्या गेलच्या बदली म्हणून इतर कोणत्याही खेळाडूला संघात सामील करणार की नाही याबाबत पंजाबकडून अद्याप कोणतेही स्पष्ट करण्यात आलेले नाही. वेस्ट इंडियन (West Indies) सीपीएल (CPL) साठी तयार केलेल्या बायो-बबलमधून दुबईला रवाना झाला होता आणि संरक्षित वातावरणात राहिल्याने कोविडच्या काळात इतर अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंप्रमाणेच त्याच्यावरही परिणाम झाला, ज्याने त्याला हा निर्णय घेण्यास भाग पाडले. (IPL 2021 Playoff Race: ‘या’ संघाचे प्लेऑफ तिकीट पक्के, तर चौथ्या स्थानासाठी 4 संघात चुरशीची लढत)
पंजाब किंग्सने गुरुवारी 30 सप्टेंबरच्या रात्री ट्विट केले आणि गेलने स्पर्धेतून विश्रांती घेतल्याची माहिती दिली. आपल्या निर्णयाचे कारण सांगताना गेल म्हणाला, “मी गेल्या काही महिन्यांत क्रिकेट वेस्ट इंडिज, कॅरेबियन प्रीमियर लीग आणि आता आयपीएलच्या बबल एक भाग आहे आणि मला स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार व ताजेतवाने ठेवायचे आहे. मला माझे लक्ष वेस्ट इंडीजला टी-20 विश्वचषकात मदत करण्यावर आणि दुबईतच विश्रांती घ्यायची आहे. मला विश्रांती दिल्याबद्दल मी पंजाब किंग्जचे आभार मानतो. माझ्या प्रार्थना आणि आशा नेहमीच (पंजाब किंग्ज) संघासोबत असतात. आगामी सामन्यांसाठी शुभेच्छा.”
पंजाब किंग्स निवेदन
त्याचवेळी, फ्रँचायझीने आपल्या वतीने एक निवेदनही जारी केले आणि म्हटले की ते गेलच्या निर्णयाचा आदर करतात आणि त्याला पूर्ण पाठिंबा देतात. पंजाबने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “पंजाब किंग्स एक फ्रँचायझी म्हणून आयपीएल 2021 मधून माघार घेण्याच्या क्रिस गेलच्या निर्णयाला समजते आणि त्याचे समर्थन करते. संघ क्रिकेटपटूच्या निर्णयाचा आदर करतो आणि गेलला प्रत्येक शक्य मार्गाने पाठिंबा देत राहील. फ्रँचायझी आगामी टी-20 विश्वचषकासाठी ‘युनिव्हर्स बॉस’ला शुभेच्छा देते.” आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज संघात सामील होण्यापूर्वी गेल दुबईत राहण्याची शक्यता आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)