IPL 2020: झहीर खान याची युएईमधील मराठमोळी शाळा, मुंबई इंडियन्सच्या दिग्विजय देशमुखला मराठीतून देतोय गोलंदाजीचे धडे (Watch Video)

या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच आणि भारताचे वेगवान गोलंदाज झहीर खान टीमचा युवा गोलंदाज दिग्विजय देशमुखला चक्क मराठीतूनच प्रशिक्षण देताना दिसला.

झहीर खान याची युएईमधील मराठमोळी शाळा (Photo Credit: Facebook)

इंडियन प्रीमिअरलीग लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्राची दमदार सुरुवात झाली आहे. आजच्या 13व्या सामन्यात किंग्स इलेव्हन पंजाब (Kings XI Punjab) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे. यासाठी दोन्ही टीम कसून सराव करत आहेत. या सामन्याआधी मुंबई इंडियन्सचे बॉलिंग कोच आणि भारताचे वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) टीमचा युवा गोलंदाज दिग्विजय देशमुखला (Digvijay Deshmukh) चक्क मराठीतूनच प्रशिक्षण देताना दिसला. एकेवेळी मुंबई इंडियन्सकडून खेळाडू म्हणून खेळलेला झहीर आज टीमच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे. आजच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर "झॅक आणि दिग्विजय यांच्यासह टीम टॉक"च्या कॅप्शनसह एक व्हिडिओ शेअर केला ज्यात झहीर मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा युवा गोलंदाज दिग्विजयला गोलंदाजीचे धडे देताना दिसतोय. (MI vs KXIP, IPL 2020: केएल राहुल, मयंक अग्रवालसाठी मुंबई इंडियन्सचा ‘प्लॅन’ तयार, किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध मुकाबल्यापूर्वी कोच शेन बॉन्डने केला खुलासा)

मुंबईने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नेटमध्ये सराव करताना दिग्विजयला गोलंदाजीत काही मदतीची गरज पडली व अडचणीच्या या वेळी झहीरने त्याला सल्ला देताना दिसला आणि ते देखील अगदी मराठमोळ्या स्टाईलमध्ये. गोलंदाजी करताना फूट-वर्क कसं असावं याबाबत दिग्विजय काहीसा चिंतीत दिसत होता पण त्या गोष्टीचा फारसा विचारकरु नकोस असा सल्ला झहीरने त्याला दिला. पाहा झहीरच्या युएईमधील मराठमोळ्या शाळेचा हा व्हिडिओ:

दुसरीकडे, मुंबई इंडियन्सबद्दल बोलायचे तर टीमची सुरुवात निराशाजनक राहिली. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध दुसऱ्या सामन्यात त्यांनी दमदार पुनरागमन केले आणि युएईच्या धरतीवर पहिला विजय मिळवला. पण, नंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध रोचक सामन्यात सुपर ओव्हरमध्ये पराभव पत्करावा लागला. आज किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध सामन्यात मुंबई विजय मिळवून स्पर्धेतील आपली गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करतील. मुंबई आणि पंजाबमधील आजचा सामना अबू धाबी येथे खेळला जाईल. मुंबई इंडियन्स आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या तर किंग्स इलेव्हन 5व्या स्थानावर विरजमान आहेत.