IPL 2020: युवराज सिंह कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळणार? KKR CEO वेंकी म्हैसूर यांच्या ट्विटने नव्या चर्चांना उधाण
ऑस्ट्रेलियाचा तुफान फलंदाज क्रिस लिन याला आगामी आयपीएलसाठी रिलीज करण्याच्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाच्या निर्णयाचा माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंह याने खंडन केलं आहे. यावर केकरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे ज्यामुळे आता नवीन चर्चांना उधाण आले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा तुफान फलंदाज क्रिस लिन (Chris Lynn) याला आगामी आयपीएलसाठी (IPL) रिलीज करण्याच्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाच्या निर्णयाचा माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंह (Yuvraj Singh) याने खंडन केलं आहे. अबू धाबी टी -10 लीगमध्ये मराठा अरेबियन्सकडून खेळताना लिनने 30 चेंडूत 91 धावा केल्या. या लीगमध्ये लिन आणि युवी एकत्र खेळतात. केकेआरच्या या निर्णयावर युवराज म्हणाला, "लिनने या सामन्यात चांगली फलंदाजी आणि काही आश्चर्यकारक शॉट्स खेळले. त्याने केकेआरला चांगली सुरुवात कौन दिली आहे. केकेआरने लिनला रिटेन का नाही हे मला खरोखरच समजत नाही. मला वाटते की हा एक वाईट निर्णय आहे आणि शाहरुख खान याने त्याबद्दल अहवाल द्यावा.” यावर आता केकरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी म्हैसूर (Venky Mysore) यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे ज्यामुळे आता नवीन चर्चांना उधाण आले आहेत. (T10 League 2019: KKR संघातून रिलीज केल्यानंतर क्रिस लिन याने टी10 लीगमध्ये खेळला तुफानी डाव, रचला इतिहास)
आयपीएलच्या आगामी आवृत्तीसाठी भारताच्या 2011 क्रिकेट विश्वचषकचा नायकला संघात शामिल करण्याबाबत संघाने आवड दाखवली आहे. वेंकीने लिहिले, “युवराज आम्ही लिनला रिलीज केले जेणेकरुन आम्ही तुमच्यासाठी बोली लावू शकू! तुमच्या दोघांच्या चॅम्पियन्सवर प्रेम आणि आदर!”
37 वर्षीय युवराजने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यानंतर त्याने कॅनडामधील ग्लोबल टी-20 आणि आता टी-10 लीगमध्ये खेळत आहे. मागील वर्षी मुंबई इंडियन्स संघाने युवीला त्याची बेस प्राईज 1 कोटी रुपयांमध्ये लिलावात घेतले होते. पण, युवी काही खास कामगिरी करू शकला नाही. मुंबईसाठी मागील वर्षी युवराज चार सामने खेळत 98 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 53 धावा होती. यानंतर सर्व सामन्यात त्याला बाहेर बसावे लागले होते. डिसेंबरमध्ये होणाऱ्या लिलावासाठी अनेक मोठ्या खेळाडूंना रिलीज करण्यात आले आहे. कोलकाता नाइट रायडरने रॉबिन उथप्पा यालाही रिलीज केले आहे. दुसरीकडे, हनुमा विहारी आणि क्रिस मॉरिस सारख्या खेळाडूंना दिल्ली कॅपिटल्स संघातून वगळण्यात आले आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)