IPL 2020 MI Practice Session: मुंबई इंडियन्सच्या नेट सत्रात 'हिटमॅन'ची फटकेबाजी, रोहित शर्माने मारलेला 95 मीटर लांब षटकार थेट स्टेडियमबाहेर (Watch Video)

मुंबई इंडियन्सने नुकतच सोशल मीडियावर रोहितचा सराव व्हिडिओ शेअर केला ज्यात तो आक्रमक फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. या दरम्यान रोहितने एक 95 मीटर लांब षटकार मारला जो थेट स्टेडियमच्या बाहेर गेला आणि रस्त्यावरून जात असलेल्या चालत्या बसवर पडला. रोहित मुंबईला पाचवे विजेतेपद मिळवून देण्यासाठी जय्यत तयारी करत आहे.

मुंबई इंडियन्सच्या नेट सत्रात रोहित शर्माची फटकेबाजी (Photo Credit: Twitter/mipaltan)

चार वेळा इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) विजेता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि 3 वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) यांच्यातील 19 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्याने यंदा आयपीएलची सुरुवात होईल. मुंबई आणि चेन्नईमधील सामना अबू धाबी येथे खेळला जाईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी टीम आहे. युएइमध्ये (UAE) होणाऱ्या या हंगामासाठी सर्व खेळाडू आणि संघांनी आपला सराव सुरू केला आहे. यातच मुंबईचा कर्णधार रोहितही अक्शनमध्ये परतला आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचे पहिल्यांदा सलग दुसरे विजेतेपद जिंकण्याकडे असेल. रोहितने कर्णधार म्हणून मुंबईला 2013 मध्ये पहिले आयपीएल विजेतेपद जिंकवून दिले, त्यानंतर टीमने 2015, 2017 आणि 2019 मध्ये विजेतेपद जिंकले. मुंबईला पाचवे विजेतेपद मिळवून देण्यासाठी रोहितला कर्णधारऐवजी फलंदाज म्हणूनही यशस्वी कामगिरी भाजावी लागेल आणि यासाठी तो जय्यत तयारी करत आहे. (Mumbai Indians IPL 2020 SWOT Analysis: मुंबई इंडियन्स टीमचे संपूर्ण विश्लेषण, आयपीएल 13 पूर्वी जाणून घ्या रोहित शर्माच्या टीमची ताकद आणि कमजोरी)

मुंबई इंडियन्सने नुकतच सोशल मीडियावर रोहितचा सराव व्हिडिओ शेअर केला ज्यात तो आक्रमक फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. या दरम्यान रोहितने एक 95 मीटर लांब षटकार मारला जो थेट स्टेडियमच्या बाहेर गेला आणि रस्त्यावरून जात असलेल्या चालत्या बसवर पडला.

गतविजेत्या मुंबईकडून यावेळीही चांगल्या खेळीची अपेक्षा असणार आहे. मुंबई आणि सीएसके आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघ आहेत. दोन्ही टीममध्ये आंतराष्ट्रीय जर्जाचे अव्वल खेळाडू आहेत, ज्यांच्यात सामना जिंकावण्याची क्षमता आहे. दोन्ही संघाला आयपीएल 13 पूर्वी मोठा झटका बसला आहे. मुंबईकडून लसिथ मलिंगा तर चेन्नईकडून सुरेश रैना आणि हरभजन सिंह यांनी यंदा स्पर्धेतून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. रैना युएईमधून टीममध्ये 13 कोरोना पॉसिटीव्ह प्रकरणं आढळल्यावर भारतात परतला. रैनाच्या परतण्यामागे वैयक्तिक कारण देखील होते. दरम्यान, आयपीएलच्या गेल्या हंगामातील चॅम्पियन संघासाठी रोहितने मोलाचं योगदान दिलं होते. त्याने 15 सामन्यात 28.92च्या सरासरीनं 405 धावा केल्या होत्या. रोहितने आजवर आयपीएलमध्ये 188 सामने खेळले, ज्यात 31.60च्या सरासरीने 4898 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now