IPL 2020 Update: CSKला दिलासा! खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची कोविड-19 टेस्ट निगेटिव, 3 सप्टेंबर रोजी होईल आणखी एक टेस्ट

सोमवारी सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांची नियमानुसार कोरोना व्हायरस टेस्ट करवण्यात आली ज्याचा अहवाल नकारात्मक आला आहे. दरम्यान, 3 सप्टेंबर रोजी सर्वांची आणखी एक टेस्ट केली जाईल ज्यानंतर ते 5 सप्टेंबरपासून प्रशिक्षण सुरु करू शकतात.

चेन्नई सुपर किंग्स (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings_ मागील आठवडा आव्हानात्मक ठरला. दोन गोलंदाजासह एकूण 13 सदस्यांनी कोरोना व्हायरसची (Coronavirus) सकारात्मक लागण झाल्याचे समोर आले. सुरुवातीला 28 ऑगस्टपासून प्री-हंगाम शिबिर सुरू करावयास हवे होते, मात्र यलो आर्मीला आणखी एका आठवड्यासाठी क्वारंटाइन करण्यात आले. दीपक चाहर (Deepak Chahar) आणि रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaekwad) या दोन क्रिकेटपटूंसोबत सीएसकेच्या इतर सहाय्यक कर्मचार्‍यांची कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, सीएसके (CSK) टीम आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा दिलासादायक माहिती मिळाली आहे. सोमवारी सर्व खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांची नियमानुसार कोरोना व्हायरस टेस्ट करवण्यात आली ज्याचा अहवाल नकारात्मक आला आहे. दरम्यान, 3 सप्टेंबर रोजी सर्वांची आणखी एक टेस्ट केली जाईल ज्यानंतर ते 5 सप्टेंबरपासून प्रशिक्षण सुरु करू शकतात. (सुरेश रैनाने नातेवाईकांवर दरोडेखोरांच्या हल्ल्याबाबत सोडले मौन, पंजाब पोलिसांना प्रकरणात लक्ष घालण्याची केली विनंती)

या बातमीने फ्रँचायझीला थोडासा दिलासा मिळाला असेल. मागील आठवडा सीएसके साठी रोलर-कोस्टर राइडप्रमाणे सिद्ध झाला जेव्हा टीममधील 13 जण कोरोना पॉसिटीव्ह आढळले आणि अनुभवी फलंदाज सुरेश रैनाने ‘वैयक्तिक समस्यांमुळे’ टी-20 स्पर्धेतून माघार घेतली. दुसरीकडे, भारताचा ज्येष्ठ ऑफस्पिनर हरभजन सिंहने युएईला जाणे थांबवले आहे. परंतु काही अहवालानुसार अनुभवी गोलंदाजही यंदा स्पर्धेतून बाहेर राहण्याचा विचार करत आहे, परंतु अद्याप याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. दुसरीकडे, फाफ डु प्लेसिस सोमवारी अबू धाबी येथे दाखल झाले आणि थेट क्वारंटाइन झाला आहे.

या सर्वांमध्ये सीएसकेच्या आयपीएलच्या तयारीला कोणता मोठा फटका बसला. सुरेश रैनाने वैयक्तिक कारणे सांगून स्पर्धेतून माघार घेतली. मंगळवारी रैना यांनी आपले मौन मोडून पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांना पठाणकोट येथे त्यांच्या कुटूंबावरील हल्ल्यात सामील असलेल्या अज्ञात हल्लेखोरांवर कारवाई करण्याची विनंती केली. रैना म्हणाला, “पंजाबमध्ये माझ्या कुटुंबाचे काय झाले ते भयावह होता. माझ्या काकाचा कत्तल करण्यात आला, माजी आत्या आणि माझ्या चुलत भावांना गंभीर दुखापत झाली. दुर्दैवाने, आयुष्याशी झगडत असलेल्या माझ्या चुलतभावाचेही काल रात्री निधन झाले. माझ्या आत्याची स्थिती अजूनही गंभीर आहे आणि ती व्हेंटिलेटरवर आहे.”