IPL 2020 Team Update: युएईला जाण्यासाठी RCB सज्ज, कॅप्टन विराट कोहलीच्या अनुपस्थितीने यूजर्स विचारात (See Photos)
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे खेळाडू युएईला जाण्याच्या तयारीत आहेत. आरसीबीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केली आहेत. या सर्व खेळाडूंमध्ये चाहत्यांना आरसीबी कर्णधार विराट कोहलीची कमतरता मात्र जाणवतेय. आणि त्यांनी आपल्या प्रतिक्रियांनी ती बोलून देखील दाखवली.
इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 2020 हंगामासाठी आयपीएल फ्रँचायझी (IPL Franchises) सज्ज होत आहेत. सर्व फ्रॅन्चायझींनी देशातील खेळाडूंना क्वारंटाइन करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरु केली होते तर आता टीममधील खेळाडू संयुक्त अरब अमिरातीला (United Arab Emirates) रावाना होण्यासाठी सज्ज आहेत. किंग्स इलेव्हन पंजाबचे काही खेळाडू-मोहम्मद शमी, दीपक हुड्डा, मनदीप सिंह, वसिम जाफर, आजच रवाना झाले तर आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे (Royal Challengers Bangalore) खेळाडू देखील युएईला (UAE) जाण्याच्या तयारीत आहेत. आरसीबीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केली आहेत. युएईमध्ये बायो सिक्योर प्रोटोकॉल अंतर्गत ही स्पर्धा खेळली जाईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-20 लीगसाठी आयपीएल फ्रँचायझींना स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) सुपूर्द केले आहे. बीसीसीआयने दिलेल्या एसओपीनुसार, आयपीएलचे सर्व फ्रँचायझी संघ स्वतंत्र हॉटेलमध्ये राहतील. (IPL 2020 Update: किंग्ज इलेव्हन पंजाबची चाहत्यांना गुड मॉर्निंग गिफ्ट; मोहम्मद शमी, वसीम जाफरसह टीम UAE साठी रवाना, पाहा Photo)
आरसीबीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, मोहम्मद सिराज, शिवम दुबे आणि उमेश यादव यांचे कोविड-19 किट आणि क्रिकेट किट तयार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे खेळाडू पहिले युएईला रवाना होणार असल्याचं दिसत आहे.
View this post on Instagram
A post shared by Royal Challengers Bangalore (@royalchallengersbangalore) on
दरम्यान, या सर्व खेळाडूंमध्ये चाहत्यांना आरसीबी कर्णधार विराट कोहलीची कमतरता मात्र जाणवतेय. आणि त्यांनी आपल्या प्रतिक्रियांनी ती बोलून देखील दाखवली.
विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) एक अशी टीम आहे ज्यात जगभरातील सुपरस्टार्स असूनही आरसीबीला एकदाही आयपीएलचे जेतेपद जिंकता आले नाही. यावेळी विराटकडे आयपीएलच्या पहिल्या विजेतेपदावर लक्ष लागणार आहे. त्याचबरोबर, अनेक क्रिकेट दिग्गजांचेही मत आहे की युएईमध्ये आरसीबीचा फायदा होईल. आरसीबीने आयपीएलच्या लिलावात एकूण सात खेळाडू विकत घेतले. आरसीबीने आरोन फिंच, जोशुआ फिलिप आणि शाहबाज अहमद हे अव्वल क्रमातील फलंदाज विकत घेतले. याशिवाय फिनिशर म्हणून पवन देशपांडे, अष्टपैलू क्रिस मॉरिस आणि इसरु उडाना यांनाही खरेदी केले आहे. आरसीबीने दोन परदेशी वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन आणि डेल स्टेन यांनाही आपल्या संघात समाविष्ट केले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)