IPL 2020: बीसीसीआयने टूर्नामेंट स्थगित केल्यावर श्रीलंका बोर्डाने आयपीएलचे आयोजन करण्याची दिली ऑफर
दरम्यान, श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) या स्पर्धेचे आयोजन करण्याची ऑफर दिली आहे.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) गुरुवारी कोविड-19 (COVID-19) मुळे पुढच्या सूचनांपर्यंत अधिकृतपणे स्थगित करण्यात आली आहे, पण टी-20 स्पर्धेसाठी आपल्याला एक सुरक्षित विंडो मिळेल भारतीय क्रिकेट बोर्डाचा असा विश्वास आहे. दरम्यान, श्रीलंका क्रिकेटने (SLC) या स्पर्धेचे आयोजन करण्याची ऑफर दिली आहे. एसएलसीचे अध्यक्ष शम्मी सिल्वा (Shammi Silva) यांनी कोलंबोमध्ये रॉयटर्सला सांगितले की, “श्रीलंकेला भारताआधी कोरोनामुक्त होईल असे दिसते आहे.” श्रीलंकेत आजवर कोरोना विषाणूचे फारच कमी रुग्ण आढळले आहेत. येथे 400 पेक्षा कमी रुग्ण आहेत आणि या साथीच्या आजारामुळे श्रीलंकेत फक्त आजवर 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक होण्यापूर्वी आयपीएलचे संभाव्य आयोजनासाठीसप्टेंबर-ऑक्टोबर विंडोवर भारतीय माध्यमांचा अंदाज आहे. (IPL 2020 अनिश्चित काळासाठी स्थगित; Coronavirus संकटाच्या पार्श्वभुमीवर BCCI चा निर्णय, क्रिकेट चाहत्यांना धक्का)
सिल्वा म्हणाले, "जर तसे असेल तर आम्ही येथे स्पर्धेचे आयोजन करू शकतो. आम्ही लवकरच भारतीय क्रिकेट बोर्डाला पत्र लिहित आहोत," असे ते पुढे म्हणाले. डिसेंबरमध्ये झालेल्या खेळाडूंच्या लिलावात 62 क्रिकेटपटूंना 18.34 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आले होते. कोलकाताच्या लिलावात जलदगती गोलंदाज ऑस्ट्रेलियन पॅट कमिन्ससाठी कोलकाता नाईट रायडर्सने सर्वाधिक 15.5 कोटी रुपयांत खरेदी केले होते. 29 मार्चपासून सुरू होणारी आठ संघांची लीग बुधवारी सुरूवातीला निलंबित करण्यात आली होती. गेल्या महिन्यात भातरात तीन आठवड्यांच्या लॉकडाउन जाहीर करण्यात आला होता. पण कोरोना रुग्नांची संख्या पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन 3 मे पर्यंत वाढवला.
आरोग्यविषयक चिंता आणि लॉकडाऊन उपाय लक्षात घेऊन आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने पुढील सूचना होईपर्यंत 2020 चा हंगाम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी एका निवेदनात दिली. "देशाचे आरोग्य आणि आमच्या महान खेळामध्ये सहभागी असलेले प्रत्येकजण आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे ..." शाह म्हणाले. “बीसीसीआय सर्व भागधारकांसह जवळच्या भागीदारीत संभाव्य प्रारंभ तारखेसंदर्भातील परिस्थितीचे परीक्षण आणि आढावा घेईल ...” शाह पुढे म्हणाले.