IPL Auction 2025 Live

IPL 2020 Sponsorship Deal: Dream11 ची स्पॉन्सरशिप फक्त 13व्या हंगामापुरतीच, BCCI ने नाकारली 2021 व 2022 साठीची बोली

पुढील वर्षांच्या कराराबद्दल बीसीसीआय नंतर चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं कळतंय. 13व्या हंगामासाठी करण्यात आलेल्या करारानुसार ड्रीम11 आणि बीसीसीआयमधील करार 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू असणार आहे.

ड्रीम11 आयपीएल (Photo Credit: Twitter)

कल्पनारम्य गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम11 (Dream11) यंदा आयपीएलचे टायटल स्पॉन्सर (IPL Title Sponsor) म्हणून बीसीसीआयने (BCCI) घोषणा केली, पण 2021 आणि 2022 साठी कमी बोली सादर केल्यामुळे कंपनीचा सशर्त 3-वर्षाचा प्रस्ताव नकारला. भारत-चीनमधील ताणल्या (India-China Tension) गेलेल्या संबंधामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या 13व्या हंगामाची स्पॉन्सरशिप ड्रीम11 कंपनीला देण्यात आली. पुढील वर्षांच्या कराराबद्दल बीसीसीआय नंतर चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं कळतंय. 13व्या हंगामासाठी करण्यात आलेल्या करारानुसार ड्रीम11 आणि बीसीसीआयमधील (BCCI) करार 31 डिसेंबर 2020 पर्यंत लागू असणार आहे. स्पर्धेची 13 वी आवृत्ती युएईमध्ये 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान खेळली जाईल. मंगळवारी यंदाच्या आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी ड्रीम11ने 222 कोटींसह सर्वाधिक बोली लगावली. Byju’s, अनअकॅडेमी यांनी देखील सर्वाधिक बोली लगावली पण ती ड्रीम11 विरोधात कमी होती. Byju’sने 201 कोटी, तर अनअकॅडेमीने 170 कोटींची बोली लागवल्याचं समजलं जात आहे. (Dream11 मध्ये चिनी गुंतवणूक, तरीही करारासाठी भारत-चीन सीमा वादाकडे दुर्लक्ष करत असल्याचा CAIT चा आरोप)

तथापि, बीसीसीआय 3 वर्षांच्या सशर्त बिडला मान्य करण्यास तयार नाही कारण 2021 आणि 2022 मध्ये 222 कोटींपेक्षा जास्त पैसे मिळू शकतील असे त्यांना वाटते. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 2020 च्या स्पॉन्सरशिप पैशात कपात होईल असा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे, तर बीसीसीआय 2021 आणि 2022 साठी चांगल्या डीलकडे पाहत आहे. बीसीसीआयने 10 ऑगस्ट रोजी एक्सप्रेसन्स ऑफ इंटरेस्ट (ईओआय) बाबत बोलताना हे स्पष्ट केले होते की ते सर्वोच्च बोली लावणार्‍याला अधिकार देऊ शकत नाहीत परंतु निर्णय बऱ्याच घटकांवर अवलंबून असेल ज्यांचे मूल्यांकन आणि परीक्षण केले जाईल.

चिनी मोबाईल कंपनी VIVO 2017 मध्ये मिळालेल्या 5 वर्षांच्या करारासाठी प्रत्येक वर्षीबीसीसीआयला 440 कोटी रुपये देत होते, 2017 मध्ये 2,199 कोटी रुपयांची बोली लावून VIVOने स्पॉन्सरशिप मिळवली होती. भारत-चीनमधील सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर चिनी मोबाइल निर्माता कंपनी आणि बीसीसीआयने आयपीएल 2020 चा करार निलंबित केला परंतु VIVO पुढील वर्षी परत येऊन त्यांचा प्रारंभिक करार पूर्ण करण्याचा पर्याय अद्याप ओपन आहे.