IPL 2020 Qualifier 2: SRH विरुद्ध तीन चेंडूत 3 विकेट घेऊनही कगिसो रबाडाची हॅटट्रिक हुकली, जाणून घ्या कारण

या दरम्यान दिल्लीच्या कगिसो रबाडाने दुसऱ्या डावातील 19 वी ओव्हर टाकली आणि तीन चेंडूंत तीन विकेट घेतल्या. पण रबाडाच्या या कारनाम्याला आयपीएलच्या हॅटट्रिकच्या यादीमध्ये स्थान मिळाले नाही.

कगिसो रबाडा आणि श्रेयस अय्यर (Photo Credit: PTI)

युएईमध्ये सुरू असलेल्या आयपीएल (IPL) 13 मध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना खेळण्यात आला. या सामन्यात दिल्लीने बॅट आणि बॉलने दमदार खेळ करत पहिल्यांदा फायनलमध्ये स्थान मिळवले. शिखर धवनच्या 78, मार्कस स्टोइनिसच्या (Marcus Stoinis) 38 आणि शिमरॉन हेटमायरच्या नाबाद 42 धावांच्या बळावर दिल्लीने हैदराबादपुढे धावांचा डोंगर उभारला. सामन्यात एक क्षण असा आला जेव्हा हैदराबाद  टीम ताकदीने विजयाच्या दिशेने वाटचाल करत होती. या दरम्यान दिल्लीच्या कगिसो रबाडाने (Kagiso Rabada) दुसऱ्या डावातील 19 वी ओव्हर टाकली आणि तीन चेंडूंत तीन विकेट घेतल्या. पण रबाडाच्या या कारनाम्याला आयपीएलच्या हॅटट्रिकच्या यादीमध्ये स्थान मिळाले नाही. दिल्लीने दिलेल्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद केन विल्यमसनने (Kane Williamson) संघर्षपूर्ण अर्धशतक ठोकलं, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. (IPL 2020 Purple Cap Holder List: 'पर्पल कॅप' साठी कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह यांच्यात रस्सीखेच; DC गोलंदाजाने पटकावले अव्वल स्थान)

विल्यमसनने सामन्यात हैदराबादचे आव्हान कायम राखण्यासाठी 67 धावा केल्या पण डावाच्या 18व्या षटकात स्टोइनिसने विल्यमसनची विकेट घेत सामान्यचे चित्रच बदलून टाकलं. त्यानंतर रबाडाने 19व्या षटकातील तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट्स घेत दिल्लीला पुनरागमन करून दिलं. रबाडाने तीन चेंडूत तीन विकेट्स घेतल्या परंतु त्याने चौथ्या आणि पाचव्या चेंडू दरम्यान वाईड चेंडू फेकला, ज्यामुळे रबाडाच्या या तीन विकेट्स हॅटट्रिक मानल्या गेल्या नाही. 190 धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नर 2, प्रियम गर्ग 17, मनिष पांडे 21 आणि जेसन होल्डर 11 धावा करून स्वस्तात बाद झाले. विल्यमसन एकाकी लढा देत झुंझार अर्धशतक ठोकलं पण तो मोक्याच्या क्षणी माघारी परतला.

दरम्यान, हैदराबादला 17 धावांनी पराभूत करून दिल्लीने पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये धडक मारली. आता ते दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये मंगळवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुध्द पहिल्या विजेतेपदासाठी मैदानावर उतरतील. दुसरीकडे, मुंबईचे स्पर्धेतील रेकॉर्ड पाचव्या विजेतेपदाच्या निर्धारित असतील. यापूर्वी, मुंबईने रोहितच्या नेतृत्वात सार्वधिक चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यांनतर चेन्नई सुपर किंग्सने तीन, तर कोलकाता नाईट रायडर्सने दोनदा विजेतेपद जिंकले आहेत.