IPL 2020 Purple Cap Holder List: 'पर्पल कॅप' साठी कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह यांच्यात रस्सीखेच; DC गोलंदाजाने पटकावले अव्वल स्थान
रबाडाने सर्वाधिक 30 विकेट घेतल्या आणि अव्वल स्थान पटकावले.
IPL 2020 Purple Cap Holder List: दुबईत झालेल्या आयपीएल 2002 च्या अंतिम फेरीत इंडियन प्रीमियर लीगचा मुख्य स्पर्धकमुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एकही विकेट न मिळाल्याने दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा पर्पल कॅपचा मानकरी ठरला. रबाडाने सर्वाधिक 30 विकेट घेतल्या आणि अव्वल स्थान पटकावले. दुसरीकडे, मुंबईचा अनुभवी यॉर्कर स्पेशलिस्ट बुमराहला अंतिम सामन्यात 4 ओव्हरमध्ये एकही विकेट नाही. बुमराहने एकूण 27 विकेट घेत दुसरे स्थान मिळवले. यानंतर मुंबई इंडियन्सचा दुसरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने तिसरे सर्वाधिक 25 विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये पहिल्यांदा गोलंदाजांनी 25 किंवा अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. आरसीबीच्या युजवेंद्र चहलने 21 आणि सनरायझर्स हैदराबादच्या राशिद खानने 20 विकेट घेतल्या व पाचवे स्थान मिळवले. (IPL 2020 Orange Cap Holder List: आयपीएल 13 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 5 खेळाडूंची लिस्ट)
आयपीएल (IPL) स्पर्धेच्या शेवटी, मोसमात सर्वोत्तम गोलंदाजी व फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे पर्पल कॅप (Purple Cacp) आणि ऑरेंज कॅप देण्यात येते. संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली जाते. प्रत्येक सामन्यासह या यादीत बदल होत राहातील आणि स्पर्धेच्या अखेरीस पर्पल कॅप (Purple Cap) मिळवण्यासाठी गोलंदाजांना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागला आहे.
Rank | Player | Team | Matches Played | Wickets |
1 | कगिसो रबाडा | दिल्ली कॅपिटल्स | 17 | 30 |
2 | जसप्रीत बुमराह | मुंबई इंडियन्स | 15 | 27 |
3 | ट्रेंट बोल्ट | मुंबई इंडियन्स | 15 | 25 |
4 | एनरिच नॉर्टजे | दिल्ली कॅपिटल्स | 16 | 22 |
5 | युजवेंद्र चहल | रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर | 15 | 21 |
आयपीएलच्या पहिल्या सत्रात म्हणजेच 2008 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज सोहेल तन्वीरने पर्पल कॅप जिंकली होती. राजस्थान रॉयल्सकडून खेळत एकूण 22 विकेट्स घेऊन तनवीरने या मोसमात शानदार गोलंदाजी केली. आयपीएलचा पहिला सत्र राजस्थान संघाने जिंकला आणि त्यात सोहेल तन्वीरने मुख्य भूमिका बजावली होती. यानंतर, आरपी सिंहनेडेक्कन चार्जर्सकडून खेळताना त्याने एकूण 23 विकेट घेऊन 2009 मध्ये पर्पल कॅप आपल्या नावावर केली. यानंतर, 2010 मध्ये, प्रग्यान ओझा यांनी पर्पल कॅप ताब्यात घेतला. 2011 मध्ये लसिथ मलिंगा, 2012 मध्ये मॉर्ने मॉर्केल, 2013 मध्ये ड्वेन ब्राव्हो, 2014 मध्ये मोहित शर्मा, 2015 मध्ये ड्वेन ब्राव्हो, 2016 मध्ये भुवनेश्वर कुमार, 2017 मध्ये भुवनेश्वर कुमार, 2018 मध्ये अँड्र्यू टाय आणि 2019 मध्ये इमरान ताहिरने पर्पल कॅप काबीज केली.