IPL 2020 Qualifier: पॉईंट्स टेबलमध्ये 16 गुण असूनही मुंबई इंडियन्सला प्ले ऑफचं तिकीट नाही; तर DC, RCB साठीही दिल्ली अभी दूर है!

प्ले ऑफच्या आधी फक्त आठ सामने शिल्लक असताना अखेरच्या चारमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत संघ कसलीही कासार सोडत नाही आहे. मुंबई इंडियन्सने आरसीबीचा पाच विकेटने पराभव केला आणि गुणतालिकेत अव्वल असून प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्क झालं आहे. पण आयपीएलकडून अद्याप यावर शिक्कामोर्तब झालं. इतकंच नाही तर दिल्ली कॅपिटल्ससाठीही अद्याप 'दिल्ली दूरच आहे'!

IPL 2020 Qualifier: पॉईंट्स टेबलमध्ये 16 गुण असूनही मुंबई इंडियन्सला प्ले ऑफचं तिकीट नाही; तर DC, RCB साठीही दिल्ली अभी दूर है!
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

IPL 2020 Qualifiers: प्ले ऑफच्या आधी फक्त आठ सामने शिल्लक असताना अखेरच्या चारमध्ये स्थान मिळवण्याच्या शर्यतीत संघ कसलीही कासार सोडत नाही आहे. राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) पराभूत केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने पहिल्यांदा प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याची साधी गमावली. युएई येथे सुरु असलेली आयपीएलचे (IPL) 13वे सत्र आता उत्तरार्धाकडे झुकत चालले आहे आणि प्रत्येक सामन्यासह आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये (IPL Points Table) बदल होत आहेत. मागील सामन्यात मुंबई इंडियन्सने आरसीबीचा (RCB) पाच विकेटने पराभव केला आणि गुणतालिकेत अव्वल असून प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्क झालं आहे. पण आयपीएलकडून अद्याप यावर शिक्कामोर्तब झालं. इतकंच नाही तर दिल्ली कॅपिटल्ससाठीही (Delhi Capitals) अद्याप 'दिल्ली दूरच आहे'! (IPL 2020: देवदत्त पडिक्कल ते रवी बिश्नोई; 13व्या हंगामात 'या' युवा खेळाडूंनी केले डेब्यू; कोणी फ्लॉप तर कोणी गाजवतंय मैदान)

मुंबई इंडियन्सने 12 सामन्यात 8 विजय मिळवत 16 गुणांची कमाई केली असून ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. पण शिल्लक सामने व गुणतालिकेवर नजर मारल्यास 5 संघ 16 गुणांपर्यंत मजल मारु शकतात असं दिसतंय त्यामुळे कोणते चार संघ क्वालिफाय होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. इतर संघांच्या सामन्यानंतर प्ले ऑफचं चित्र स्पष्ट होईल असं दिसत आहे. मुंबईचा संघ प्ले ऑफच्या जवळपास आहे तर एकेवेळी आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या दिल्लीसमोर आला प्ले ऑफ शर्यतीतून बाहेर पडण्याचे संकट ओढवले आहे. दिल्लीने 13व्या सत्राची दमदार सुरुवात केली, पण एकावेळी मजबूत वाटणारा डीसी संघाची स्थिती खराब बनून आहे. दिल्ली सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर असून मागील तीन सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पराभवामुळे दिल्लीच्या नेट रनरेटमधेही घसरण झाली आहे आणि सलग तीन पराभवनंतर दिल्ली प्ले ऑफमध्ये प्रवेश करेल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आरसीबीचे देखील दोन सामने शिल्लक आहेत ज्यात पराभव झाल्यास त्यांना प्ले ऑफमध्ये स्थान मिळवणे कठीण जाईल.

प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी मुंबई, आरसीबी, दिल्ली, पंजाब, कोलकाता आणि हैदराबाद संघ या शर्यतीत आहेत. मुंबई नेट रनरेटने आघाडीवर असल्याने त्यांचे स्थान निश्चित मानले जात आहे तर बेंगलोर, दिल्ली, कोलकाता, पंजाब आणि हैदराबाद यांच्यात अन्य स्थानांसाठी लढाई पाहायला मिळत आहे. या सर्वांना सामना जिंकणे गरजेचे आहे, तर एक पराभव देखील त्यांच्या अडचणीत वाढ करू शकतो. अशास्थितीत आयपीएल प्ले ऑफची लढत रंगतदार होणार हे नक्की.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)



Share Us