IPL 2020 PlayOffs, Final Schedule PDF Download: इंडियन प्रीमियर लीग 13 चे सर्व संपूर्ण वेळापत्रक, स्थान आणि वेळ, वाचा सविस्तर

या लीगचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. सर्व प्ले ऑफ सामने संध्याकाळी 7:30 वाजता खेळले जातील. आयपीएल 2020 प्लेऑफ पूर्ण वेळापत्रक पीडीएफ स्वरूपात विनामूल्य डाउनलोड करा.

IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

IPL 2020 PlayOffs, Final Schedule PDF: इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 13व्या सत्राच्या प्ले ऑफ आणि फायनलचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहेत. या लीगचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Dubai International Stadium) खेळला जाईल. त्यापूर्वी 5 नोव्हेंबरला दुबई पहिल्या क्वालिफायर होस्ट करेल. त्यानंतर 6 नोव्हेंबर आणि 8 नोव्हेंबर रोजी अबू धाबी (Abu Dhabi) येथे अ‍ॅलिमिनेटर व दुसरा क्वालिफायर खेळला जाईल. सर्व प्ले ऑफ सामने संध्याकाळी 7:30 वाजता खेळले जातील. दरम्यान, आयपीएल प्ले ऑफची (IPL PlayOffs) शर्यत रंगतदार बनली आहे. प्रत्येक संघांचे 11 सामने झाले आहेत पण एकही संघ अंतिम-4 मध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. आयपीएल 2020 प्लेऑफ पूर्ण वेळापत्रक पीडीएफ स्वरूपात विनामूल्य डाउनलोड करा.

इंडियन प्रीमिअर लीगचा 13वा हंगाम जो मार्च 2020 मध्ये प्रथम खेळाले जाणार होते, ते कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे पुढे ढकलण्यात आले आणि नंतर संयुक्त अरब अमिरातीमध्ये शेड्यूल झाले. आयपीएलची सुरुवात 19 सप्टेंबर 2020 रोजी झाली होती आणि 10 नोव्हेंबर, 2020 रोजी लीग संपुष्टात येईल. अबू धाबी येथे सर्व प्ले ऑफ सामने खेळले जात आहेत तर अंतिम सामना दुबई येथे आयोजित केला जाणार आहे. आयपीएल 2020 मध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी पॉईंट्स टेबलमध्ये पहिले तीन स्थान पटकावले आहेत. मात्र, किंग्ज इलेव्हन पंजाब, सनरायझर्स हैदराबाद आणि काही प्रमाणात राजस्थान रॉयल्सही अव्वल-चौथ्या स्थानासाठी लढत आहे.

दुसरीकडे, आयपीएलच्या तितिहासात पहिल्यांदा एमएस धोनीची चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफ पात्रता मिळवण्यास अपयशी ठरली आहे. आरसीबीविरुद्ध सीएसकेने विजय मिळवला असला तरी राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरुद्ध दमदार विजय मिळवला आणि सीएसकेचे आव्हान संपुष्टात आणले. 2008 नंतर धोनीच्या नेतृत्वात संघाने 10 आयपीएलमध्ये प्ले ऑफमध्ये स्थान मिळवले होते, पण यंदा स्पर्धेत संघाला चांगली कामगिरी करता आली नाही परिणामी संघाला गुणतालिकेत अंतिम स्थानी समाधान मानावे लागले. याशिवाय, किंग्स इलेव्हन पंजाबला देखील कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे अन्यथा त्यांचेही प्ले ऑफमध्ये पोहचणे कठीण होऊ शकते.