Deepak Chahar COVID-19 Test: कोरोना व्हायरसवर मात करून दीपक चाहर प्रशिक्षणासाठी परतला, मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या सामन्यासाठी करणार तयारी

ज्यात संघाचा चॅम्पियन वेगवान गोलंदाज दीपक चाहरचादेखील समावेश होता. आणि आता तो कोरोनावर मात करून बबलमध्ये परतला आहेत.  बुधवारी त्याची दुसरी कोरोना टेस्टही नकारात्मक आली.

दीपक चाहर (Photo Credit: Getty Images)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या आवृत्तीस सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) टीमला अडचणींचा सामना करावा लागला. युएईला पोहोचल्यानंतर संघातील दोन खेळाडूंसह एकूण 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. ज्यात संघाचा चॅम्पियन वेगवान गोलंदाज दीपक चाहरचा (Deepak Chahar) देखील समावेश होता. आणि आता तो कोरोनावर मात करून संघात परतला आहे. बुधवारी त्याची दुसरी कोरोना टेस्टही नकारात्मक आली आणि त्यानंतर तो मुंबईविरुद्ध पहिल्या सामन्यात खेळणार हे नक्की झालय. यावेळी आयपीएलचे (IPL) आयोजन भारताऐवजी युएईमध्ये होत आहे. बीसीसीआयकडून युएईमध्ये पोहोचल्यानंतर सर्व जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात संघातील खेळाडू, क्रीडा कर्मचारी आणि संघ व्यवस्थापनाचा समावेश होता. चेन्नई टीममधील एकूण 13 सदस्यांची कोविड-19 टेस्ट सकारात्मक आली असून त्यात संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर आणि फलंदाज रुतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad) समावेश होता. (Suresh Raina Workout for IPL: सुरेश रैनाने पुन्हा सुरु केला सराव, 'तुझ्याशिवाय CSK ची कल्पना करू शकत नाही' म्हणत युजर्सने परतण्याचे केले आवाहन)

सीएसकेच्या अधिकृत ट्विटर पेजवर चाहरचा ग्राऊंडवरील फोटो शेअर करण्यात आला, वेगवान गोलंदाज सराव करण्यासाठी तयार असल्याचा संदेश देण्यात आला. सीएसकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के एस विश्वनाथन यांनी बुधवारी पीटीआयला सांगितले की, "दीपक चाहरची दोन कोविड टेस्ट नकारात्मक आल्या आहेत व तो टीम बबलमध्ये परतले आहेत." विश्वनाथन पुढे म्हणाले, "आता बीसीसीआयच्या प्रोटोकॉलनुसार त्याची हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी टेस्ट होईल, जी त्याच्या रिकव्हरीचा सूचक असेल. त्यानंतर, त्याची आणखी एक कोविड टेस्ट होईल, आणि जर ती नकारात्मक आली तर तो प्रशिक्षणास येऊ शकेल."

दीपकच्या परतीविषयी ते म्हणाले की, हे त्याच्या रिकव्हरीवर अवलंबून आहे. "मी वेळ ठरवू शकतो पण पुढचे चार दिवस तरी निश्चितपणे सांगू शकत नाहीत." चाहर व्यतिरिक्त फलंदाज रुतुराज, सीएसकेचा दुसरा खेळाडू देखील कोरोना पॉसिटीव्ह आढळला होता. तथापि, त्याची तब्येतही चांगलीच दिसून येत आहे आणि त्याचा क्वारंटाइन कालावधी 12 सप्टेंबर रोजी संपत आहे. तथापि, सीएसकेचे दोन्ही खेळाडू खेळण्यासाठी कधी परतू शकतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.