IPL 2020: आयपीएल खेळाडूंचा लिलाव येत्या 19 डिसेंबरला, कोलकाता शहराला प्रथमच संधी

प्रतिवर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आयपीएल खेळाडूंचे लिलाव पहिल्यांदाच कोलकाता शहरात पार पडत आहेत. कोलकाता हे शाहरुख खान यांची मालकी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचे हे होम पिच आहे.

Indian Premier League 2019 Player Auction is held on December 18 (Photo Credits: IPL/Facebook)

IPL 2020: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) अर्थातच आयपीएल पर्व 2019 (IPL 2020) साठी खेळाडूंच्या लिलावाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता (Kolkata) शहरात ही लिलाव प्रक्रिया पार पडेल. आयपीएल संचालन परिषदच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रतिवर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या आयपीएल खेळाडूंचे लिलाव पहिल्यांदाच कोलकाता शहरात पार पडत आहेत. कोलकाता हे शाहरुख खान यांची मालकी असलेल्या कोलकाता नाइट रायडर्स संघाचे हे होम पिच आहे.

आयपीएल संजालन परिषदेच्या एका सदस्याने बैठकीनंतर सांगितले की, 'आयपीएल लिलाव कोलकाता शहरात येत्या 19 डिसेंबर रोजी पार पडतील. ही लिलाव प्रक्रिया या आधी बंगळुरु शहरात पार पडत असे.' प्रत्येक फ्रेंचाइजीसाठी 2019 मध्ये 82 कोटी रुपये निर्धारीत केले होते. जे 2020 या वर्षात वाढवण्यात आले असून, ही रक्कम प्रति संघ 85 कोटी रुपये इतके करण्यात आले आहेत. या शिवाय तीन कोटी रुपये प्रत्येक संघाकडे अतिरिक्त असतील. (हेही वाचा, Happy Birthday Virat Kohli: विराट कोहली याच्या वाढदिवशी युवराज सिंह याने शेअर केले 'हे' फोटो, पाहून तुमचेही होतील अश्रू अनावर)

संघांकडे आयपीएल 2020 पूर्वी असलेली आर्थिक पूंजी

चेन्नई सुपर किंग्स : 3.2 कोटी रुपये, दिल्ली कैपिटल्स : 7.7 कोटी रुपये, किंग्स इलेवन पंजाब : 3 . 7 कोटी रुपये, कोलकाता नाइट राइडर्स : 6 . 05 कोटी रुपये, मुंबई इंडियंस : 3 . 55 कोटी रुपये, राजस्थान रॉयल्स : 7 . 15 कोटी रुपये, रायल चैलेंजर्स बेंगलोर : 1 . 80 कोटी रुपये, सनराइजर्स हैदराबाद : 5.30 कोटी रुपये.