IPL 2020 Controversial Umpiring Decisions: आयपीएल13 मधील अंपायरांचे 'हे' निर्णय ठरले वादग्रस्त, पाहून तुमच्याही भुवया उंचावतील, पाहा Videos
यंदाही या स्पर्धेत अंपायरांजडून काही वादग्रस्त निर्णय घेण्यात आले ज्याचा फटका खेळाडू आणि संघांनाही बसला. किंग्स इलेव्हन पंजाब फलंदाजांना देण्यात आलेले आलेली एक कमी धाव असो किंवा कथितपणे एमएस धोनीने बदलेला ऑन फिल्ड अंपायरचा निर्णय असो या सर्वांवर लोकांनी देखील नाराजी व्यक्त केली.
इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) 2020 आता आपल्या अंतिम चरणी येऊन पोहचला आहे. यंदाही या स्पर्धेत अंपायरांकडून काही वादग्रस्त (Controversial Umpiring Decisions) निर्णय घेण्यात आले ज्याचा फटका खेळाडू आणि संघांनाही बसला. आयपीएल आणि विवादांचा संबंध खूप पूर्वीपासूनचा आहे. आयपीएल (IPL) 2020 मध्ये काही मनोरंजक सामने पाहायला मिळाले आहेत, तर मैदानावर बाहेरच वादही पाहायला मिळाले. त्यातूनही अंपायरांच्या काही मोठ्या निर्णयांनी मैदानावरील खेळाडूंसह टीव्हीवर सामना पाहणाऱ्या प्रेक्षकांचे भुवया उंचावल्या. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब फलंदाजांना देण्यात आलेले आलेली एक कमी धाव असो किंवा कथितपणे एमएस धोनीने बदलेला ऑन फिल्ड अंपायरचा निर्णय, ते नो-बॉल ववाईड बॉल निर्णय असो पंचांच्या निर्णयाने विवाद निर्माण केला ज्यावर लोकांनी देखील नाराजी व्यक्त केली. (CSK vs KXIP, IPL 2020: रुतुराज गायकवाडने गोड केला सुपर किंग्सचा शेवट, चेन्नई 9 विकेटने विजयी; किंग्स इलेव्हनसाठी प्ले ऑफचा दरवाजा बंद)
1. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळल्या जाणार्या सामन्यात वाइड बॉलवरून वाद झाला. हैदराबादच्या डावाच्या 19व्या ओव्हरमध्ये शार्दुल ठाकूरने चेंडूला स्टंपच्या बाहेर जाताना दिसला. पंच पॉल राफेलने वाईड बॉल देण्यासाठी हात उंचावला पण महेंद्र सिंह धोनीची प्रतिक्रिया पाहिल्यानंतर त्यांनी लगेच हात खाली खेचले. यानंतर सोशल मीडियावर या वादा निर्माण झाला बऱ्याच जणांनी म्हटले की पंचांनी अशाप्रकारे निर्णय बदलू नये.
2. आयपीएल 2020 च्या दुसर्या सामन्यात मोठा वाद समोर आला. दिल्ली आणि पंजाब यांच्यातील सामना टाय झाला. पंजाबच्या फलंदाजी दरम्यान मयांक अग्रवाल आणि क्रिस जॉर्डन यांनी 19व्या षटकातील तिसर्या चेंडूवर 2 धावा काढल्या, पण अंपायर नितीन मेनन यांनी एक धाव दिली. पहिली धाव घेताना जॉर्डनने बॅट क्रिजच्या आत न ठेवल्याने धाव पूर्ण केली नाही असं त्यांचं मत होत. मात्र, टीव्ही रीप्लेमध्ये बॅटच्या क्रीजच्या आत स्पष्टपणे दिसत होती. यामुळे, पंजाब आणि दिल्लीमधील सामना टाय झाला व अखेरीस दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.
3. आयपीएल 2020 मधील आणखी एक वादग्रस्त प्रकरण चेन्नईच्या एका सामन्यात पाहायला मिळालं. राजस्थानच्या चेन्नईविरुद्ध डावाच्या 18व्या ओव्हरमध्ये दीपक चाहरच्या 5व्या चेंडूवर अंपायर सी शमशुद्दीन यांनी टॉम कुरनला कॅच आउट दिले. टॉमने अंपायरच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. राजस्थानकडे रिव्यू शिल्लक नसल्याने कुरन मैदानाबाहेर जाण्यासाठी चालू लागला. या दरम्यान, दोन्ही ऑन फिल्ड पंचांनी आपापसात बोलणी करून थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला. रिव्यू नसतानाही थर्ड अंपायरकडे जेव्हा हा निर्णय देण्यात आला तेव्हा धोनीनेही पंचांशी संवाद साधला. जेव्हा थर्ड अंपायरने व्हिडिओ परत पाहिला तेव्हा बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क झाला नसल्यचे दिसले आणि अंपायरांनी माघारी परतलेल्या कुरन परत बोलावले. हे प्रकरण आयपीएल 2020 च्या वादग्रस्त गोष्टींपैकी एक आहे.
4. हैदराबाद आणि बेंगलोर सामन्यातही अंपायरचा एक वादग्रस्त निर्णय सोशल मीडियावर चर्चेचा मुद्दा ठरला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दहाव्या ओव्हरमध्ये इसुरु उदानाने टाकलेला एक चेंडू केन विल्यमसनच्या डोक्यावरुन जात होता. विल्यमसनने कसाबसा फटका खेळला, परंतू आश्चर्याची बाब म्हणजे अंपायरांनी तो चेंडू नो-बॉल ठरवला नाही. ज्यामुळे विल्यमसनलाही आश्चर्याचा धक्का बसला.