IPL 2020: एमएस धोनी प्रशिक्षण शिबीरासाठी चेन्नईमध्ये दाखल, सोशल मीडियावर नवीन रूपाची चर्चा, (Photo)

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या सत्रासाठी सर्व संघ तयारीला लागले आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी ही प्रशिक्षण शिबिरासाठी चेन्नईमध्ये पोहोचला आहे. या सर्वांपेक्षा सध्या धोनीच्या नवीन रूपाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. धोनी दर वर्षी आयपीएलपूर्वी त्याच्या रूपात काही बदल करत असतो.

एमएस धोनी (Photo Credit: Instagram)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्राची सुरुवात 29 मार्चपासून होणार आहे. यासाठी सर्व संघ तयारीला लागले आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) ही प्रशिक्षण शिबिरासाठी चेन्नई मध्ये पोहोचला आहे. 38 वर्षीय धोनी सोमवारपासून चेन्नईच्या एम.ए चिदंबरम स्टेडियम (MS Chidambaram Stadium) वर इतर खेळाडूंसह प्रशिक्षण सुरू करणार आहे. गतविजेत्यामुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल (IPL) 2020 चा पहिला सामनाहोणार आहे. सहकारी सुरेश रैना, अंबाती रायुडू आणि अन्य खेळाडूंसोबत धोनी 19 मार्चपर्यंत चेन्नईमध्ये प्रशिक्षण घेणार असल्याचे बोलले जात आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी तो ब्रेक घेईल आणि मग खेळण्यास सुरुवात करेल. चेन्नई सुपर किंग्जने रविवारी वर्ल्ड कप विजेता कर्णधार शहरात दाखल झाल्याचा फोटो ट्विट करून चाहत्यांना माहिती दिली. (Video: IPL पूर्वी एमएस धोनी रांचीमध्ये करतोय शेती; टरबूज, पपईची लागवड करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल)

'थाला' धोनीने आयपीएलच्या इतिहासातील चेन्नई सुपर किंग्जलाही सर्वात यशस्वी संघ बनविला आहे. या सर्वांपेक्षा सध्या धोनीच्या नवीन रूपाची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. धोनी दर वर्षी आयपीएलपूर्वी त्याच्या रूपात काही बदल करत असतो. आपल्या या अंदाजाने तो सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतो. यंदाही हा क्रिकेटपटू एका वेगळ्या रूपात दिसणार आहे. होय, यंदा धोनी आयपीएल दरम्यान मिशी धारण करणार आहे. मात्र, यंदा त्याने त्याच्या हेअर स्टाईलमध्ये काही बदल केला नाही आहे. धोनीची स्टायलिस्ट सपना भवानीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती दिली. पाहा फोटो:

 

View this post on Instagram

 

. Mere dost bahut khushi hogi tumhe IPL main dekhne khelte hue. Chennai we see you soon!!!! #newhair #mahiaarahahai #csk #captainsaab #dhoni #fangirl #sapnabhavnani #madowothair #ipl #yellowlove 🌕💛🍋⭐️🌙💫🌼🌻🐱

A post shared by 𝖆 𝖑𝖎𝖙𝖙𝖑𝖊 𝖜𝖔𝖒𝖆𝖓 (@sapnamotibhavnani) on

सीएसकेने शेअर केलेला फोटो पाहा:

आयसीसी विश्वचषकात न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर धोनी क्रिकेटपासून दूर आहे. तेव्हापासून त्याच्या निवृत्तीबाबत अनेक तर्क वर्तवले जात आहेत. तथापि, याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. धोनीने 9 जुलै, 2019 रोजी शेवटचा वनडे सामना खेळला होता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now