IPL 2020 Mid-Season Transfer: मुंबई इंडियन्सच्या 'या' 3 खेळाडूंचे होणार मिड-सीजन ट्रांसफर? एका विदेशी क्रिकेटरसाठी रंगू शकते चढाओढ

गतजेता मुंबई इंडियन्स सध्या सर्वात परिपूर्ण संघ दिसत आहे, त्यामुळे त्यांच्यात काही बदल होण्याची संधी दिसत नाही. मुंबईमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना यंदा एकही संधी मिळाली नाही, तर काही फक्त एक-दोन सामन्यात झळकले आहेत.

मुंबई इंडियन्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13व्या सत्राची थरारक सुरुवात झाली आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्सने आपले वर्चस्व कायम ठेवले असून गुणतालिकेत त्यांनी अनुक्रमे पहिले दोन स्थान मिळवले आहेत. आयपीएलचे 2020 सीजन संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे खेळले जात आहे आणि आठही संघात जबरदस्त लढाई पाहायला मिळत आहे. असे बरेच खेळाडू आहेत ज्यांना अद्याप आयपीएलमध्ये (IPL) आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली नाही आणि बाकावर बसले आहेत. अशा खेळाडूंसाठी स्पर्धेच्या मध्यात एक वेगळीच संधी चालून येत आहे आणि ती म्हणजे मिड-सीजन ट्रांसफरची. यामुळे फ्रँचायझी टीममधील आपापली कमजोर बाजू मजबूत करू शकतात, तर बाकावर बसलेल्या खेळाडूंना देखील मॅच खेळण्याची संधी मिळते. प्रत्येक संघाचे 7 सामने झाल्यावर मिड-सीजन ट्रांसफरची विंडो (Mid-Season Transfer Window) उघडेल. दरम्यान, गतजेता मुंबई इंडियन्स सध्या सर्वात परिपूर्ण संघ दिसत आहे, त्यामुळे त्यांच्यात काही बदल होण्याची संधी दिसत नाही. (IPL 2020 Mid-Season Transfer: आयपीएल 13मध्ये 'या' खेळाडूंचे होऊ शकते 'मिड सीजन ट्रांसफर', पाहा कोण-कोण आहे सामील)

मुंबईमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना यंदा एकही संधी मिळाली नाही, तर काही फक्त एक-दोन सामन्यात झळकले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या क्रिस लिनचा (Chris Lynn) समावेश सर्वात आधी होतो. सलामीला खेळणाऱ्या लिनला मुंबईने आयपीएल लिलावात 2 कोटी रुपयात खरेदी केले होते, पण यंदा त्याला सामना खेळण्यास मिळाला नाही. अशा परिस्थितीत मिड-सीजन ट्रांसफर विंडोमध्ये लिनसाठी अन्य फ्रँचायझींमध्ये चढाओढ रंगू शकते. अन्य खेळाडू म्हणजे वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी आणि शेरफेन रदरफोर्ड. धवलने आयपीएल लिलावातून मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा प्रवेश मिळवला. यापूर्वीही त्याने मुंबईकडून गोलंदाजी केली पण यंदा त्याला एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. यापूर्वी धवल राजस्थान रॉयल्सकडून खेळला होते. दुसरीकडे, रदरफोर्डला मागील वर्षी दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केले होते, पण ट्रांसफर विंडोद्वारे तो मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. मात्र, यंदा एकही सामना न खेळलेल्या रदरफोर्डला मुंबई ट्रांसफर विंडोमध्ये पाठवू शकते.

यावर्षीच्या आयपीएलमध्ये आपण विलक्षण क्रिकेट पाहिले आहे, ज्यात जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आहे. निर्विवादपणे, हे काही आठवड्यांपासून अ‍ॅक्शनने भरलेले होते. यामध्ये अजून मसाला आणि ठार म्हणून मिड-सीजन लवकरचं सुरुवात होणार आहे. मात्र, कोणत्या खेळाडूला या विंडोमध्ये पाठवायचे आहे याचा पूर्ण निर्णय फ्रँचायझीवर अवलंबून आहे.