IPL 2020 बनले सर्वात यशस्वी सत्र, दर्शक संख्येने गाठला 31.57 लाखांचा उच्चांक, Star India ची माहिती

इंडियन प्रीमियर लीगचे अधिकृत प्रसारक स्टार इंडियाने असा दावा केला आहे की टीव्ही प्रेक्षक संख्येत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि टी-20 स्पर्धा पाहणाऱ्यांची संख्या 31.57 लाख झाली आहे.

आयपीएल 2020 ट्रॉफी (Photo Credit: Instagram/iplt20)

IPL 2020 Viewership: इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) अधिकृत प्रसारक स्टार इंडियाने (Star India) असा दावा केला आहे की टीव्ही प्रेक्षक संख्येत 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि टी-20 स्पर्धा पाहणाऱ्यांची संख्या 31.57 लाख झाली आहे. एका दिवसात डबल सुपर ओव्हर्स, युवा प्रतिभावान खेळाडू, उत्साहवर्धक सामान्यांपर्यंत सीझन-13 मध्ये चाहत्यांना सर्व काही पाहायला मिळाले. चाहत्यांनी घरात आरामात सामन्यांचा आनंद घेतला आणि आयपीएल 2020 ने दर्शक वाढीत 23% ने वाढ झाली. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (Broadcast Audience Research Council) इंडियाकडून आकडेवारी काढली गेली असून हिंदी, बंगाली, तेलगू, तामिळ आणि कन्नड या पाच प्रादेशिक भाषांमधील व्याप्तीमुळे दर्शकसंख्या वाढली आहे. चॅनेलच्या म्हणण्यानुसार, नुकत्याच झालेल्या आवृत्तीत स्त्रियांमध्ये अनुक्रमे 24 टक्के आणि मुलांमध्ये 20 टक्के वाढ झाली आहे. स्टार 13 इंडियाचे क्रीडा प्रमुख संजोग गुप्ता म्हणाले की, "सीझन 13 मध्ये नाविन्यपूर्ण प्रोग्रामिंग आणि जागतिक दर्जाचे उत्पादन पाहिले गेले." (IPL 2020 चे युएई येथे आयोजन करण्यासाठी BCCIने अमिराती क्रिकेट बोर्डाला कोटी रुपयांची दिली मोठी रक्कम, ऐकून तुमचे डोळे विस्फारतील)

‘एक साथ वाली बात’ या मोहिमेपासून ड्रीम 11 आयपीएल 2020 ची विक्रमी सुरुवात झाली. या मोहिमेचे उद्दीष्ट म्हणजे वर्षाच्या सर्वात मोठ्या क्रिकेटींग स्पर्धेसाठी लोकांना एकत्र करून देशाची मनोवृत्ती उंचावणे होते. यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस सुरु होणारे आयपीएल भारतात कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, नंतर आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कप स्पर्धे पुढे ढकलण्यात आल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदा संयुक्त अरब अमिराती येथे स्पर्धे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. आणि शारजाह, दुबई आणि अबू धाबी येथे आयोजन करण्यासाठी बीसीसीआयने अमिराती क्रिकेट बोर्डाला 100 कोटी रुपये दिले असल्याचेही वृत्त समोर आले आहे.

यंदाच्या हांगामात प्रेक्षकांना अनेक मनोरंजनक सामने पाहायला मिळाले, तर स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा प्रसिद्ध असलेला चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयशी ठरला. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी करत पाचवे विजेतेपद जिंकले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई संघाने सुरुवातीपासून वर्चस्व कायम ठेवले आणि फायनल सामन्यात विजय मिळवला. शिवाय, साखळी फेरीच्या अंतिम सामान्यांपर्यंत प्ले ऑफमधील अंतिम तीन संघ निश्चित झाले नव्हते. मुंबई इंडियन्स सर्वप्रथम पहिल्या चारमध्ये स्थान मिळवले होते.