Video: CSK सराव सत्रात एमएस धोनीच्या चाहत्याने तोडली सुरक्षा, मैदानात धाव घेत 'Thala' च्या पायाला केला स्पर्श
सराव खेळाच्या वेळी, एका व्यक्तीने मैदानावरील सुरक्षा तोडली आणि एमएसकडे धाव घेतली, जो स्टंपच्या मागे विकेटकिपिंग करत होता.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या आगामी आवृत्तीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) पुनरागमनापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) मंगळवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियम (Chepauk Stadium) येथे सराव खेळ खेळला. आयसीसी विश्वचषक 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या सामन्यानंतर कर्णधार धोनी जवळपास 9 महिन्यांपूर्वी मैदानात उतरला. सराव खेळाच्या वेळी, एका व्यक्तीने मैदानावरील सुरक्षा तोडली आणि एमएसकडे धाव घेतली, जो स्टंपच्या मागे विकेटकिपिंग करत होता. चाहता धोनीच्या पाया पडला आणि नंतर सुरक्षा कर्मचार्यांनी त्याला पळवून लावले. खेळादरम्यान महेंद्र सिंह धोनीने फक्त विकेटकिपिंग केली नाही तर फलंदाजी करत काही मोठे शॉट्सही खेळले. आयपीएल (IPL) आधी, धोनीने प्रसारित केलेल्या ऍडमधून आपल्या टीकाकारांना चोख उत्तर दिले. (CSK च्या सराव सत्रात झाले एमएस धोनी चे धमाकेदार स्वागत, स्टेडियममध्ये फॅन्सनी केला 'धोनी धोनी' चा गजर, पाहा Video)
चाहत्यांचा मैदानावर पोहोचण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये धोनी आणि अन्य खेळाडू मैदानावर सराव करत असताना एक चाहता सुरक्षा रक्षकांना मागे टाकून धोनीच्या जवळ पोहचला आणि त्याच्या पाया पडला. नंतर सुरक्षा रक्षकांनी त्याला मैदानाबाहेर नेले. पाहा व्हिडिओ:
29 मार्च रोजी वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळल्या जाणार्या टूर्नामेंट पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना गतजेता मुंबई इंडियन्सशी होईल. मागील वर्षी दोन्ही संघात थरारक अंतिम सामना खेळला गेला ज्यात मुंबईने 1 धावानी विजय मिळवला. चेन्नई आणि मुंबई आयपीएलमध्ये यशस्वी फ्रॅन्चायसी आहेत. मुंबईने सर्वाधिक 4, तर चेन्नईने 3 वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. दरम्यान, माजी भारतीय कर्णधारासाठी हा मोसम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. येथे चांगला खेळ केल्या तो पुन्हा राष्ट्रीय निवड समितीच्या रडारवर प्रवेश करता येईल. टी-20 विश्वचषक जवळ येत असताना एमएसडीला भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करायला लागेल.