IPL 2020 DC vs KXIP: केएल राहुलने टॉस जिंकत घेतला पहिले गोलंदाजीचा निर्णय, पंजाबच्या प्लेइंग इलेव्हनमधून क्रिस गेल तर दिल्ली XI मधून अजिंक्य रहाणे Out

आयपीएलच्या धमाकेदार सलामीच्या सामन्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये दुसरा सामना रंगणार आहे. केएल राहुलने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयसच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीमध्ये जबरदस्त फलंदाजांचा समावेश आहे, तर दुसरीकडे पंजाबने संघात मोठे बदल केले आहे.

केएल राहुलसह KXIP सहकारी (Photo Credits: Instagram)

आयपीएलच्या धमाकेदार सलामीच्या सामन्यानंतर आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि किंग्स इलेव्हन पंजाबमध्ये (Kings XI Punjab) दुसरा सामना रंगणार आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करेल तर केएल राहुल (KL Rahul) किंग्ज इलेव्हन पंजाब संघाची धुरा सांभाळेल. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. टॉस दरम्यान केएल राहुलने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रेयसच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीमध्ये जबरदस्त फलंदाजांचा समावेश आहे, तर दुसरीकडे पंजाबने संघात मोठे बदल केले आहे. मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंजाब संघ पहिला सामना खेळणार आहे. दोन्ही टीमचा आयपीएलमधील हा पहिला सामना आहे आणि यासाठी दोघांनी दमदार प्लेइंग इलेव्हन निवडला आहे. दोन्ही टीम, ज्यांना आजवर एकही आयपीएल विजेतेपद जिंकता आले नाही, विजयाने मोहिमेची सुरुवात करू पाहत असतील. मागील वर्षांपासून श्रेयस अय्यर यंदा एक पाऊल पुढे टाकून आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश करू इच्छित असेल. श्रेयसच्या नेतृत्वात दिल्लीने मागील वर्षी प्ले-ऑफपर्यंत मजल मारली होती. (DC vs KXIP, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसणार 'हे' 3 मुंबईकर, बजावू शकतात महत्त्वाची कामगिरी)

दिल्लीकडे पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या रुपाने सलामी फलंदाज आहेत. दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये रविचंद्रन अश्विनला ला स्थान दिले, तर किंग्स इलेव्हन पंजाबने देखील टीममध्ये पुन्हा सामील करण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलला संधी दिली आहे. मॅक्सवेलने नुकतंच इंग्लंडविरुद्ध अखेरच्या वनडे मालिकेत तुफानी शतक ठोकले होते. पंजाबकडून कर्णधार केएल राहुल आणि मयंक अग्रवाल डावाची सुरुवात करतील. 2018 आणि 2019 मध्ये पंजाबचा सर्वाधिक धावा करणारा म्हणून शेवटची काही वर्षे राहुल स्थिर राहिला आहे. यंदा त्याला कर्णधारपदी देण्यात आले आहे, त्यामुळे त्याच्याकडून फलंदाजीसह नेतृत्वाची देखील मोठी जबाबदारी असणार आहे. करुण नायर आणि निकोलस पूरन टॉप-ऑर्डरमध्ये राहुलला पाठिंबा देतील.

पाहा दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाबचे प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स टीम: श्रेयस अय्यर (कॅप्टन), पृथ्वी शॉ, रिषभ पंत (विकेटकीपर), शिखर धवन, अक्षर पटेल, शिमरॉन हेटमायर मार्कस स्टोइनिस, कगिसो रबाडा, मोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि एनरिच नॉर्टजे.

किंग्स इलेव्हन पंजाब: किंग्स इलेव्हन पंजाब टीम: केएल राहुल (कॅप्टन), मयंक अग्रवाल, करुण नायर, निकोलस पूरन, सरफराज खान, हार्डस विल्जॉईन, ग्लेन मॅक्सवेल, शेल्टन कॉटरेल, रवि बिश्नोई, क्रिस जॉर्डन आणि मोहम्मद शमी.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

संबंधित बातम्या

Share Now