IPL 2020: DRS संदर्भात RCB कर्णधार विराट कोहलीचा प्रस्ताव; 'कर्णधारांना वाईड बॉल, नो-बॉलबाबत डीआरएस घेण्याची संधी हवी!'

आयपीएलच्या 13व्या हंगामातही चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात शार्दुल ठाकूरचा चेंडू वाईड असतानाही धोनी व शार्दुलच्या दबावामुळे अंपायर पॉल राफलने आपला निर्णय मागे घेतला होता. 

विराट कोहली (Photo Credit: Instagram)

टी-20 क्रिकेटमध्ये कर्णधारांना वाईड बॉल (Wide Ball) आणि कमरेवर चेंडू गेल्यास (High-Full Tosses) मिळणाऱ्या नो-बॉलच्या (No Ball) निर्णयांमध्ये DRS घेण्याचा पर्याय मिळायला हवा असा प्रस्ताव भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) नुकताच दिला. आयपीएल असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट, अंपायरांचे निर्णय अनेकदा चर्चेचा विषय बनतात. आयपीएलच्या (IPL0 13व्या हंगामातही पंचांनी दिलेल्या वादग्रस्त निर्णयाची चांगलीच चर्चा झाली. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील सामन्यात शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर चेंडू वाईड असतानाही धोनी आणि शार्दुलने टाकलेल्या दबावामुळे अंपायर पॉल राफल यांनी आपला वाईडचा निर्णय मागे घेतला होता. ज्यावरुन धोनीवर टीकाही झाली. यांनतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराटने यासंदर्भात एक वेगळीच मागणी केली. किंग्स इलेव्हन पंजाबचा कर्णधार आणि टीम इंडिया फलंदाज केएल राहुल याच्यासोबत इंस्टाग्राम सत्रा दरम्यान विराटने आपले मत मांडले. (SRH Vs CSK, IPL 2020: सनरायझर्स हैदराबादच्या हातातून सामना निसटला; चेन्नई सुपर किंग्ज संघाचा 20 धावांनी विजय)

कोहलीने बुधवारी इन्स्टाग्राम चॅट सत्रादरम्यान राहुलशी बोलताना म्हटले की, "एक कर्णधार म्हणून वाईड बॉलच्या निर्णयावर किंवा कमरेवर जाणाऱ्या चेंडूवर मिळणाऱ्या नो-बॉलच्या निर्णयावर DRS घेण्याची संधी मिळायला हवी, जे अनेकदा चुकीचे असतात." तो पुढे म्हणाला की, ऐतिहासिकदृष्ट्या, "या छोट्या छोट्या गोष्टींचा वेगवान टी-20 स्वरूपात आणि आयपीएलसारख्या हाय-प्रोफाइल स्पर्धांमध्ये खेळावर कसा परिणाम होऊ शकतो हे आपण पाहिले आहेत."

दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी चेन्नईने एसआरएचला दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाच्या 19व्या ओव्हरमध्ये, पंच राफलने राशिद खानने सामना केलेल्या चेंडूला वाईड देण्यासाठी हात लांब केल्यानंतर धोनी आणि गोलंदाज शार्दूल ठाकूरने निराशा व्यक्त केली. धोनीच्या हावभावानंतर पंचांनी त्याचा विचार बदलला आणि वाइडला न बोलण्याचा निर्णय घेतला. रिफेलने सीएसके कर्णधारांच्या प्रतिक्रियेकडे पाहून आपले हात खाली ठेवले आणि ही एक योग्य चेंडू म्हणून घोषित केला. दुसरीकडे, आयपीएलच्या आजच्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि केएल राहुलच्या किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात टक्कर होणार आहे. शिवाय, आजचा सामना जिंकताच आरसीबी गुणतालिकेत अव्वल स्थान देखील मिळवू शकते.