IPL 2020: सौरव गांगुली यांनी शारजाह स्टेडियमला भेट दिल्यावर दाखवली क्रिएटिविटी, फोटोत पाकिस्तानी खेळाडू दिसत असल्याने दादानं केलं असं काही!
बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुलीने शारजाह क्रिकेट स्टेडियम भेटीचा फोटो शेअर केला असून फोटोमध्ये दिसत असलेल्यादोन पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो ब्लर केले. गांगुलीने शेअर केलेले फोटो जावेद मियांदाद आणि राशिद लतीफ याचे असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, फोटो अस्पष्ट करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2020 ची आवृत्ती सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 19 सप्टेंबरपासून या आठ फ्रँचायझींनी जोरदार तयारी केली आणि स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) प्रमुख सौरव गांगुली यांनी नुकतीच तीन ठिकाणांपैकी एक शारजाह क्रिकेट स्टेडियमवरील तयारीचा आढावा घेतला. अबु धाबी, दुबई आणि शारजाह (Sharjah) येथे यंदा आयपीएलच्या संपूर्ण आवृत्तीचे आयोजन केले जाईल. शारजाह क्रिकेट स्टेडियमच्या (Sharjah Cricket Stadium) भेटी दरम्यान गांगुली ग्राउंड सुविधांवर बरीच प्रभावित झालेला दिसला आणि सोमवारी त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून एक पोस्टही शेअर केली. गांगुलीने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर लिहिले "आयपीएल 2020 चे यजमान म्हणून प्रसिद्ध शारजाह स्टेडियम तयार आहे." गांगुलीने भेटीचे तीन फोटो शेअर केले ज्यातील तिसऱ्या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. (IPL 2020 Update: बीसीसीआय बॉस सौरव गांगुली यांनी शारजाह क्रिकेट स्टेडियमचा केला दौरा, आयपीएल 13 पूर्वी तयारीचा घेतला आढावा See Pics)
गांगुलीने फोटोमध्ये दिसत असलेल्यादोन पाकिस्तानी खेळाडूंचे फोटो ब्लर केले. गांगुलीने शेअर केलेले फोटो जावेद मियांदाद आणि राशिद लतीफ याचे असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, फोटो अस्पष्ट करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. यंदाचे आयपीएल प्रदीर्घ वेळेपासून क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी हताश झालेल्या प्रख्यात क्रिकेट चाहत्यांच्या गरजा भागवेल अशी अपेक्षा आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएल 13 दोनदा स्थगित करण्यात आले होते. शिवाय, भारतात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता स्पर्धा भारताबाहेर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि आता संपूर्ण स्पर्धा युएईमध्ये होईल.
View this post on Instagram
Famous Sharjah stadium all set to host IPL 2020
A post shared by SOURAV GANGULY (@souravganguly) on
यापूर्वी भारत-पाकिस्तान आणि इतर अनेक देशांमधील सामने शारजाह येथे आयोजित केले गेले आहेत. सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, शेन वॉर्न, वसीम अक्रम अशा अनेक दिग्गजांसाठी हे एक संस्मरणीय मैदान ठरले आहे. राजकीय तणाव वाढत असल्याने भारत आणि पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये आंतरराष्ट्रीय सामने झाले नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अखेरची द्विपक्षीय मालिका 2013च्या सुरूवातीस झाली जेव्हा पाकिस्तान टीमने भारताचा दौरा केला. त्यानंतर, दोन्ही संघ केवळ बहु-राष्ट्र स्पर्धा किंवा आयसीसी स्पर्धांमध्ये आमने-सामने येतात.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)