IPL 2020 Auction मध्ये लागणार सर्वात वयस्कर प्रवीण तांबे याचीही बोली, 41 व्या वर्षी केले होते डेब्यू
इंडियन प्रीमियर लीग साठी खेळाडूंचा लिलाव वेळापत्रकानुसार कोलकातामध्ये 19 डिसेंबरला होणार आहे. यामध्ये 186 भारतीय, 143 विदेशी आणि 3 असोसिएट देशांच्या खेळाडूंची बोली लागेल. यामध्ये 48 वर्षीय लेगस्पिनर प्रवीण तांबे, हा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरला आहे.
इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 साठी खेळाडूंचा लिलाव वेळापत्रकानुसार कोलकातामध्ये 19 डिसेंबरला होणार आहे. बीसीसीआयने या लिलावासाठी एकूण 332 क्रिकेटपटूंची यादी तयार केली आहे. यामध्ये 186 भारतीय, 143 विदेशी आणि 3 असोसिएट देशांच्या खेळाडूंचा समावेश आहे. यामध्ये 48 वर्षीय लेगस्पिनर प्रवीण तांबे (Pravin Tambe), हा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरला आहे. जागतिक क्रिकेटच्या अनेक बड्या खेळाडूंनी लिलावासाठी आपली नावे नोंदविली आहेत, तर काही लोक असे आहेत की ज्यांनी काही भिन्न कारणांमुळे लक्ष वेधले आहे. त्यापैकी एक तांबेही आहे. यंदाच्या लिलावात 8 संघांमधील 73 रिक्त जागा भरल्या जातील. तांबे याचमधील एक आहे. तांबेने 41 व्या वर्षी आयपीएलमध्ये डेब्यू केले होते. दरम्यान, आयपीएलमध्ये यापूर्वीच वैशिष्ट्यीकृत असलेले तांबेला पुन्हा एकदा विक्रेता सापडेल अशी अपेक्षा आहे. (IPL 2020 Auction: लिलावासाठी 332 खेळाडू शॉर्टलिस्ट, 2 कोटींच्या टॉप बेस प्राइसमध्ये एकही भारतीय नाही)
तांबेने 2013 मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) कडून आयपीएल (IPL) मध्ये पदार्पण केले आणि त्याने अवघे तीन सामने खेळले. यावेळी लीगमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. 2013-14 चॅम्पियन्स लीग (Champions League) टी-20दरम्यान तांबेने पाच सामन्यांत 12 गडी बाद केले आणि त्या मोसमातील आघाडीचा गोलंदाज म्हणून सर्वांचे लक्ष वेधले. आयपीएल 2014 मध्ये त्याने रॉयल्ससाठी सातत्यपूर्ण कामगिरी बजावली आणि 13 सामन्यांमध्ये 15 विकेट घेत चांगली कामगिरी बजावली. त्याच्या 15 विकेट्समध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध हॅटट्रिकचाही समावेश होता.
आयपीएल 2015 मध्ये लेगस्पिनर रॉयल्सकडून दहा सामने खेळला आणि केवळ सात विकेट्स घेण्यास यशस्वी झाला. त्यानंतर रॉयल्सने त्याला रिलीज केले. 2016 मध्ये तांबेला नवीन फ्रेंचायझी गुजरात लायन्स (Gujarat Lions) सापडली आणि त्याने सुरेश रैना याच्या नेतृत्वातील संघासाठी सात सामने खेळला. त्या मोसमात तांबेने केवळ पाच विकेट्स घेतल्या. तांबे नंतर सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) मध्ये सामिल झाला, पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. तेव्हापासून तांबे आयपीएलमधून बाहेर आहे. पण, आयपीएल 2020 च्या लिलावासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंमध्ये तांबेचे नाव असून त्याची किंमत 20 लाख आहे.
आयपीएलशिवाय, तांबेने मागील वर्षी अबु धाबी येथे टी-10 क्रिकेट लीगमध्ये प्रवेश केला होता आणि 10 षटकांच्या क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज बनला. त्याच सामन्यात तांबे ने 15 धावांवर 5 गडी बाद केले होते. 2013 मध्ये आयपीएल आणि सीएल टी-20मध्ये पदार्पणानंतर तांबेने प्रथम श्रेणीमध्ये प्रवेश केला. पण, त्याने आजवर केवळ दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)