CSK vs DC, IPL 2019 Live Cricket Streaming and Score: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपीटल्स क्वालिफायर सामना, सामना आणि स्कोर पहा Star Sports आणि Hotstar Online वर
परंतु, पराभव होऊनही चेन्नई संघ मैदानाबाहेर गेला नाही. क्वालिफायर - 2 मध्ये या संघाला अंतिम सामना खेळण्यासाठी संधी आहे. मात्र, ही संधी तो कशी मिळवतो हे आजच्या सामन्याच्या निकालावर ठरणार आहे.
IPL 2019: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या 12 व्या पर्वातील तीसरा एलिमिनेटर सामना विशाखपट्नम (Visakhapatnam) येथील डॉ वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम (Dr. Y. S. Rajasekhara Reddy ACA–VDCA Cricket Stadium)वर विजेता चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि दिल्ली कैपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात हा सामना होत आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वात यशस्वी मानल्या जाणारा चेन्नई संघला क्वालीफायर-1 मध्ये तीन वेळा विजेत्या मुंबई इंडियन्स संघाने पराभवाचा सामना करायला लावला आहे. परंतु, पराभव होऊनही चेन्नई संघ मैदानाबाहेर गेला नाही. क्वालिफायर - 2 मध्ये या संघाला अंतिम सामना खेळण्यासाठी संधी आहे. मात्र, ही संधी तो कशी मिळवतो हे आजच्या सामन्याच्या निकालावर ठरणार आहे.
कुठे पहाल लाईव्ह सामना आणि स्कोअर?
CSK vs DC सामना तुम्ही टीव्ही प्रमाणे ऑनलाईन देखील पाहू शकता. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तसेच, Star Sports 1/HD, Star Sports 1 Hindi/HD, Star Sports Select 1/HD या चॅनलवर देखील तुम्हाला लाईव्ह सामना पाहता येईल. यासोबतच आपल्याला जर या सामन्याचे लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करु शकता.
दोन्ही संभाव्य संघ:
चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी (कर्णधार और विकेटकीपर), अंबाती रायडू, शेन वाटसन, सुरेश रैना, केदार जाधव, रवींद्र जडेजा, ड्वायन ब्रावो, दीपक चहर, शार्दूल ठाकुर, हरभजन सिंह, इमरान ताहिर, मुरली विजय, ध्रुव शौरे, फाफ डु प्लेसिस, ऋतुराज गायकवाड़, मिशेल सैंटनर, डेविड विली, सैम बिलिंग्स, समीर, मोनू कुमार, कर्ण शर्मा, केएम आसिफ, मोहित शर्मा. (हेही वाचा, Harrier Fan Catch Award: रिषभ पंत याचा कॅच पकडल्याने IPL पाहात स्टेडीयममध्ये बसलेला तरुण झाला लखपती)
दिल्ली कैपिटल्स: श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), पृथ्वी शॉ, अमित मिश्रा, अवेश खान, राहुल तेवतिया, जयंत यादव, कोलिन मुनरो, क्रिस मौरिस, संदीप लामिछाने, ट्रेंट बाउल्ट, शिखर धवन, हनुमा विहारी, अक्षर पटेल, ईशांत शर्मा, अंकुश बैंस, नाथू सिंह, कोलिन इंग्राम, शेरफेन रदरफोर्ड.