ICC कडून Ashwin आणि Tammy Beaumont यांना ‘प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार’ जाहीर

इंग्लंडविरुद्ध यशस्वी कामगिरीबद्दल भारताच्या रविचंद्रन अश्विनने फेब्रुवारी 2021 मध्ये आयसीसी पुरुष प्लेअर ऑफ द मंथच्या पुरस्काराचा मानकरी ठरला. महिला गटात इंग्लंडच्या टॅमी ब्यूमॉन्टला आयसीसी महिला 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून निवडले गेले.

रविचंद्रन अश्विन आणि टॅमी ब्यूमॉन्ट (Photo Credit: Facebook, Instagram)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (International Cricket Council) आज फेब्रुवारी महिन्यात आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार विजेते घोषित केले आहेत. आतापर्यंत आयसीसी 'प्लेअर ऑफ द इयर'ची घोषणा करत होते. आता त्यांनी 'प्लेअर ऑफ द मंथ' देण्याची घोषणा केली आहे. इंग्लंडविरुद्ध (England) यशस्वी कामगिरीबद्दल भारताच्या रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) फेब्रुवारी 2021 मध्ये आयसीसी पुरुष प्लेअर ऑफ द मंथच्या (ICC Men's Player of the Month) पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने खेळलेल्या 3 कसोटी सामन्यात त्याने चेन्नई येथे इंग्लंडवर झालेल्या दुसर्‍या कसोटीतील भारताच्या दुसर्‍या डावात 106 धावा केल्या आणि आणि अहमदाबाद येथे झालेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात त्याने 400 कसोटी विकेट्सचा टप्पा गाठला. मालिकेत एकूण 176 धावा आणि 24 विकेट्स घेत अश्विनने फेब्रुवारी महिन्यात पुरुष गटात चाहत्यांच्या मतांमध्ये सर्वाधिक पसंती मिळविली. हा पुरस्कार पटकावणारा अश्विन दुसरा भारतीय ठरला आहे. (ICC Player of the Month पुरस्कारासाठी Rishabh Pant याच्यासह इंग्लंड कर्णधार Joe Root आणि आयर्लंड फलंदाज पॉल स्टर्लिंग यांच्यात चुरस)

दुसरीकडे, महिला गटात इंग्लंडच्या टॅमी ब्यूमॉन्टने (Tammy Beaumont) फेब्रुवारी महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे सामने खेळले होते. जिथे तीने एकूण अर्धशतकी धावसंख्या पार करून संपूर्ण मालिकेत एकूण 231 धावा केल्या. यामुळे, 2021 फेब्रुवारी महिन्यात ब्यूमॉन्टला आयसीसी महिला 'प्लेअर ऑफ द मंथ' म्हणून निवडले गेले. दरम्यान, भारताचा रिषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेची शबनीम इस्माईल, जानेवारी महिन्यात सुरु करण्यात आलेल्या पुरस्काराचे मानकरी ठरले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन कसोटी सामन्यांमध्ये कामगिरी केल्यामुळे पंतने जानेवारी 2021 मध्ये आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार जिंकला होता. त्याने सिडनीमध्ये नाबाद 97 आणि ब्रिस्बेनमध्ये नाबाद 89 धावा केल्या होत्या. शिवाय, महिला पुरस्कारात जानेवारी महिन्यात तीन वनडे आणि दोन टी-20 सामन्यात केलेल्या शानदार कामगिरीबद्दल दक्षिण आफ्रिकेची इस्माईल आयसीसी महिला प्लेअर ऑफ द मंथ ठरली होती.

रविचंद्रन अश्विन 

या पुरस्कारासाठी आयसीसी प्रत्येक विभागात तीन खेळाडूंचे नामांकन करेल. विजेत्या खेळाडूची घोषणा महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी केली जाणार आहे. एकूण मतांमध्ये या पुरस्कारासाठी नियुक्त करण्यात आलेली अकादमीची मते 90 टक्के असतील. तर आसीसीच्या वेबसाइटचे नोंदणीकृत युझर्सची मते 10 टक्के इतकी असतील.