IND vs WI 2022 Series: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी टीम इंडियात होणार मोठा उलटफेर; जाणून घ्या कोणत्या खेळाडूंना मिळणार स्थान, कोणाला मिळणार आराम

6 फेब्रुवारीपासून मालिका सुरू होत असल्याने भारतीय बोर्ड लवकरच संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. विंडीजविरुद्ध वनडे आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संभावित संघ खालीलप्रमाणे आहे.

टीम इंडिया (Photo Credit: PTI)

IND vs WI 2022 Series: दक्षिण आफ्रिकेच्या निराशाजनक दौऱ्यानंतर, जिथे टीम इंडियाने  (Team India) कसोटी मालिका गमावली आणि नंतर वनडे सामन्यात व्हाईटवॉश झाला, तो संघ आता मायदेशी परतला आहे आणि काही दिवसांतच - मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा (West Indies) पाहुणचार करणार आहे. दोन्ही संघ तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत आमने-सामने येतील. पुढील आठवड्यात 6 फेब्रुवारीपासून मालिका सुरू होत असल्याने भारतीय बोर्ड लवकरच संघ जाहीर करण्याची शक्यता आहे. आणि यामध्ये अनेक बदल अपेक्षित आहेत. विंडीजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघात अनेक धुरंधर खेळाडूंचे पुनरागमन होईल तर काही खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संभावित संघ खालीलप्रमाणे आहे. (IND vs WI 2022 Series: भारत दौऱ्यावर वेस्ट इंडिजशी टीम इंडिया करणार दोन हात, असे आहे मर्यादित षटकांचे संपूर्ण Schedule)

नवनियुक्त कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांचे पुनरागमन भारतासाठी मोठा बदल असेल. रोहित आणि जडेजाच्या पुनरागमनामुळे संघाला बळ मिळेल, तर शिखर धवनला दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर संघात स्थान मिळण्याची शक्यता आणखी वाढली आहे. धवनसोबत ओपनर म्हणून धवनचे स्थान कायम राहिले तरी रोहितच्या साथीला केएल राहुल आणि ईशान किशन यांचीही निवड होण्याची शक्यता आहे. तर मधल्या फळीत विराट कोहली, श्रेयस अय्यर हे नियमित खेळाडू झळकतील. तर सूर्यकुमार यादवला देखील संधी दिली जाऊ शकते. दुसरीकडे, भारतीय संघाच्या गोलंदाजी आक्रमणाबद्दल बोलायचे तर भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह वेस्ट इंडिजविरुद्ध गोलंदाजी करताना दिसू शकतात. दोन्ही गोलंदाजांनी भारतीय विकेट्सवर आपल्या गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजांना खूप त्रास दिला आहे.

तसेच फिरकी गोलंदाजीबद्दल बोलायचे तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुनरागमन करणाऱ्या अश्विन आणि युजवेंद्र चहल फारसा काही प्रभाव पाडू शकले नाही. त्यानंतर निवडकर्ते अश्विन आणि चहलला बाहेर करून टीम इंडियामध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजाचा वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे आणि टी-20 मालिकेसाठी संघात समावेश करू शकतात. दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर अष्टपैलू शार्दुल ठाकूरला विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित संघ अपेक्षेप्रमाणे कायम असल्यामुळे संघाला विजयी मार्गावर परतण्याची चांगली संधी असेल.

India’s Squad For West Indies Series 2022: रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, रिषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आणि मोहम्मद सिराज.