India's Likely Playing XI for 2nd ODI: ‘हा’ बदल करताच भारताच्या विजयाचा मार्ग होणार मोकळा, दुसऱ्या वनडे अशी असेल टीम इंडिया XI

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार्लच्या बोलंड पार्क येथे दुसरा वनडे सामना रंगणार आहे. बोलंड पार्क येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताच्या मधल्या फळीतने चांगलेच निराश केले. त्यामुळे संघ व्याव्स्थापनाला मधल्या फळीत काही बदल करणे गरजेचे आहे. केएल राहुल सलामीला उतरल्यामुळे मधल्या फळीत संघाला अनुभवी फलंदाजाची नक्कीच कमतरता जाणवली.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: PTI)

India's Likely Playing XI for 2nd ODI: भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात पार्लच्या बोलंड पार्क (Boland Park) येथे दुसरा वनडे सामना रंगणार आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यात 31 धावांनी टीम इंडियावर मात करून यजमान संघ 1-0 आघाडीवर असून सिरीजमध्ये आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी भारतीय संघाला आता दुसरा सामना जिंकणे गरजेचे आहे. बोलंड पार्क येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताच्या मधल्या फळीतने चांगलेच निराश केले. त्यामुळे संघ व्याव्स्थापनाला मधल्या फळीत काही बदल करणे गरजेचे आहे. सलामीच्या सामन्यात 297 धावांचा पाठलाग करताना दबावात असलेल्या टीम इंडियाला (Team India0 श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत या युवा जोडीकडून मोठी अपेक्षा होती. पण दोघे तळ ठोकून आफ्रिकी गोलंदाजांविरुद्ध प्रभावी फलंदाजी करू शकले नाही. पंतने 16 तर श्रेयस 17 धावाच करू शकला. यामुळे भारताच्या मधल्या फळीची कमजोरी उघडपणे सर्वांसमोर आली. आणि आता निर्णायक दुसऱ्या वनडे सामन्यात विजय मिळवण्यासाठी यामध्ये एक बदल करणे गरजेचे आहे. (IND vs SA 1st ODI: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिली वनडे गमावल्यावर KL Rahul ने यांना ठरवले जबाबदार, म्हणाला - ‘इथेच सर्व गडबड झाली’)

मर्यादित षटकांचा एकदिवसीय कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शिखर धवनसह केएल राहुल सलामीला उतरला. राहुल आता सलामीला उतरल्यामुळे मधल्या फळीत संघाला अनुभवी फलंदाजाची नक्कीच कमतरता जाणवली. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात आता राहुलने मधल्या फळीत फलंदाजी करून धवनसाठी सलामीला दुसरा खेळाडू निवडणे गरजेचे आहे. आणि जर असे झाले तर युवा फलंदाज ईशान किशन यासाठी एक उपयुक्त पर्याय ठरू शकतो. किशनला श्रेयस अय्यरच्या भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाऊ शकते. किशनने गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर वनडे पदार्पण केले. यादरम्यान त्याने 2 सामन्यात फक्त 60 धावाच केल्या. पण किशन सलामीला येऊन राहुलला मधली फळी, जी पहिल्या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरली, त्याला मजबूत करण्याचा पर्याय देतो. तसेच किशनकडे यापूर्वी देखील ओपनर म्हणून ठीक-ठाक अनुभव आहे. अशाप्रकारे त्याला जर धवनची साथ मिळाली तर तो भविष्यात टीम इंडियासाठी एक योग्य ओपनर बनू शकतो.

भारताचा संभावित प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल (कॅप्टन), शिखर धवन, ईशान किशन, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement