मलाला च्या काश्मीर वरील ट्विटवर भारताची No 1 नेमबाज हिना सिद्धू ची गुगली, म्हणाली स्वतः पहिले पाकिस्तानात परतून दाखव

मलालाला प्रत्युत्तर देत हिनाने मलालाला सांगितले की पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी किती संधी उपलब्ध आहेत हे तिला चांगले माहित आहे. मलाला याची आठवण करून दिली की तिला आपला देश पाकिस्तान सोडून जावे लागले होते.

मलाला युसुफजाई आणि हिना सिद्धू (Photo Credit: Getty/PTI)

जगातील पहिल्या क्रमांकाची पिस्तूल नेमबाज हिना सिद्धू (Heena Sidhu) ने तिच्या दुहेरी मनोवृत्तीबद्दल नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफजाई (Malala Yousafzai) हिला फटकार लावली आहे. मलाला ने शनिवारी ट्विट करत यूएनजीएच्या नेत्यांना अपील केले की काश्मीर (Kashmir) मधील शांततेसाठी काम करा, काश्मिरींचा आवाज ऐका आणि मुलांना सुरक्षितपणे शाळेत जाण्यास मदत करा. तिने ट्विट केले की, "मला सध्या काश्मीरमध्ये राहणाऱ्या मुलींशी थेट बोलायचं आहे. काश्मीरमधील संचार माध्यमांवर निर्बंध असल्यामुळे लोकांच्या कथा जाणून घेण्यासाठी बरीच कामे करावी लागली. काश्मिरी जगापासून दुरावले गेले आहेत आणि त्यांचे शब्द पाळण्यास असमर्थ आहेत. काश्मीरला बोलू द्या."

मलालाच्या या ट्विटला प्रत्युत्तर देत हिनाने लिहिले, 2013 आणि 17 च्या विश्वचषकात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक जिंकणारी हिना म्हणाली की मलालाला जम्मू-काश्मीर प्रदेश पाकिस्तानला द्यावा अशी इच्छा आहे. मलालाची आठवण करून दिली की हा पाकिस्तान आहे, जिथे तिचे प्राण जाता-जाता वाचले. 2010 आणि 2018 कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणार्‍या हिनाने मलालाला सांगितले की पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी किती संधी उपलब्ध आहेत हे तिला चांगले माहित आहे. मलाला याची आठवण करून दिली की तिला आपला देश पाकिस्तान सोडून जावे लागले होते. ज्यानंतर ती कधीही पाकिस्तानमध्ये परत जाऊ शकली नाही. हिनाने मलालाला आधी पाकिस्तानात जाऊन उदाहरण बनण्यास सांगितले.

पाकिस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी आवाज उठविणाऱ्या मलालाला कट्टरपंथी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले आणि त्यानंतर तिला बऱ्याच दिवसांसाठी रूग्णालयात दाखल केले गेले होते. दरम्यान, मलालाने पुराव्याशिवाय दावा केला आहे की काश्मीरमध्ये मुलांसह 4,000 लोकांना अटक करून तुरूंगात टाकले गेले आहे. शिवाय, 40 दिवसांपासून मुले शाळेत जाऊ शकली नाहीत आणि मुली घरा बाहेर पाडण्यासाठी घाबरत आहेत असा दावाही तिने केला.