IND W vs BAN W: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर, 'या' खेळाडूंना मिळाले संघात स्थान

आफ्रिकन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन फॉरमॅटच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरला भारतीय महिला संघाची कर्णधार बनवण्यात आली आहे.

Team India (Photo Crdit - X)

IND W vs BAN W: महिला टी-20 विश्वचषक 2024 या (T20 World Cup 2024) वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बांगलादेशच्या भूमीवर खेळवला जाईल. मात्र त्याआधी भारतीय महिला संघ जूनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND W vs SA W) मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा महिला संघ भारताविरुद्ध तीन एकदिवसीय, एक कसोटी आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. आफ्रिकन संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. आता दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन फॉरमॅटच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरला भारतीय महिला संघाची कर्णधार बनवण्यात आली आहे.

स्मृती मंधानाकडे उपकर्णधारपदाची कमान

स्मृती मंधानाकडे उपकर्णधारपदाची कमान मिळाली आहे. प्रिया पुनिया आणि फिरकीपटू सायका इशाक यांनाही भारतीय महिला संघात स्थान मिळाले आहे. दुसरीकडे, जेमिमाह रॉड्रिग्स आणि पूजा वस्त्राकर यांची निवड फिटनेसवर अवलंबून आहे. तब्बल दशकभरानंतर भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे यजमानपद भूषवणार आहे.

पहिला एकदिवसीय सामना 16 जून रोजी

ऋचा घोष आणि उमा छेत्री यांना कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मध्ये यष्टिरक्षक म्हणून संधी मिळाली आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. 16 जून ते 9 जुलै दरम्यान दोन्ही संघांमधील मालिका खेळवली जाणार आहे. पहिली वनडे मालिका 16 ते 23 जून दरम्यान होणार आहे. यानंतर 28 जून रोजी एकमेव कसोटी सामना होणार आहे. त्यानंतर 5 जुलैपासून टी0 मालिका सुरू होईल. (हे देखील वाचा: Virat Kohli At Mumbai Airport: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली अमेरिकेला रवाना, मुंबई विमानतळावर दिसला; पाह व्हिडिओ)

दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी भारतीय संघ:

वनडे संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), दयालन हेमलता, राधा यादव, आशा शोभना, श्रेयंका पाटील, सायका इशाक, पूजा वस्त्राकार, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, प्रिया पुनिया.

भारतीय कसोटी संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, शुभा सतीश, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), उमा छेत्री (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, स्नेह राणा, सायका इशाक, राजेश्वरी गायकवाड. , पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, प्रिया पुनिया

भारतीय टी-20 संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, दयालन हेमलता, उमा छेत्री (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, सजना सजीवन, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, राधा यादव , अमनजोत कौर, आशा शोभना, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह ठाकूर, अरुंधती रेड्डी

स्टँडबाय-सायका इशाक

भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यातील मालिकेचे वेळापत्रक:

एकदिवसीय मालिका

16 जून: पहिला वनडे, बंगळुरू

19 जून: दुसरा वनडे, बंगळुरू

23 जून: तिसरी वनडे, बंगळुरू

एक कसोटी सामना

28 जून ते 1 जुलै: कसोटी सामना, चेन्नई

टी-20 मालिका

5 जुलै: पहिला टी-20, चेन्नई

7 जुलै: दुसरी टी-20, चेन्नई

9 जुलै: तिसरी टी-20, चेन्नई