Taniya Bhatia: भारतीय महिला क्रिकेटपटू तानिया भाटिया हिच्या सामानाची लंडनमध्ये चोरी; सोशल मीडियावर दावा
टीम इंडियाच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर होती. या वेळी हा संघ मुक्कामी असलेल्या लंडन येथील हॉटेलमध्ये (Marriot Hotel London) तिसे सामान लुटण्यात आले.
भारतीय महिला क्रिकेट (India Women's Cricket Team) संघाची यष्टिरक्षक-फलंदाज तानिया भाटिया (Taniya Bhatia) हिने सोमवारी (26 सप्टेंबर) सोशल मीडियावर दावा केला की लंडन येथे तिच्या सामानाची चोरी झाली. टीम इंडियाच्या वनडे मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर होती. या वेळी हा संघ मुक्कामी असलेल्या लंडन येथील हॉटेलमध्ये (Marriot Hotel London) तिसे सामान लुटण्यात आले. तानिया भाटिया (India women's cricketer Taniya Bhatia) 10 ते 24 सप्टेंबर दरम्यान खेळल्या गेलेल्या T20I आणि ODI मालिकेसाठी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा भाग होती.
सोशल मीडियावर सोमवारी संध्याकाळी आपल्या ट्विटर हँडलवरुन तिने दोन ट्विट केले. ज्यात तिने तिच्यासोबत घडलेली कहाणी कथन केली. तानियाने दावा केला की "कोणीतरी" लंडन हॉ मॅरियट टेलमध्ये तिच्या खोलीत घुसले आणि तिचे सामान चोरले. यात रोख रक्कम आणि दागिण्यांचा समावेश आहे. तानियाने तिच्या ट्विटमध्ये भारतीय संघाला पुरवण्यात आलेल्या खराब सुरक्षेबद्दल ईसीबीवर टीका केली. (हेही वाचा, IND vs AUS T20 Series: भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका जिंकली, अक्षर पटेल मालिकावीर तर सूर्यकुमार यादव ठरला सामनावीर)
ट्विटमध्ये तिने म्हटले आहे की, हॉटेल मॅरियट मध्ये मझ्यासोबत घडलेल्या घटनेमुळे मला धक्का बसला. भारतीय महिला क्रिकेट संघाचा एक भाग म्हणून मी दौऱ्यावर असताना आम्ही हॉटेलमध्ये मुक्कामी होतो. या वेळी कोणीतरी व्यक्ती माझ्या खोलीत घुसली. त्यांनी माझ्याकडी साहित्य (रोख, कार्ड, घड्याळे आणि दागिन्यांसह) माझी बॅग चोरली. घडल्या प्रकारामुळे मला असुरक्षीत वाटत असल्याचेही तिने म्हटले आहे.
ट्विट
भारतीय संघाचा भाग असूनही खेळाडूंना आवश्यक सुरक्षा पुरवली जात नाही. हॉटेलमध्ये त्यांच्या सामनाची चोरी होते हे धक्कादायक आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी केली जाईल आणि न्याय मिळेल, अशी आपेक्षाही भाटीया हिने आपल्या ट्विटमध्ये केली आहे.