IPL 2019: चिअर लिडर्स डान्स, इतिहास आणि वैशिष्ट्य! घ्या जाणून सविस्तर..
या चिअर लिडर्सनी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. मैदानावर खेळाडूंनी केलेली मनपसंत कामगिरी आणि चिअर लिडर्सनी केलेले मनोरंजन अशी दुहेरी मेजवानी क्रीडारसिकांना मिळाली.
Indian Premier League अर्थातच आयपीएल 2019 चा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. हा थरार अनुभवताना आपण अनेक गोष्टी स्मरणात ठेवल्या असतील. या गोष्टींसोबत प्रत्येक चौकार, षटकार आणि विकेट घेताच आपल्या लयबद्ध नृत्याचा अविष्कार दाखवत चिअरप करणाऱ्या चिअर लिडर्सही आपल्या डोळ्यासमोर अनेकदा तरळल्या असतील. तुम्हाला माहिती आहे का? चीयर लीडर्स (Chair Ladders) या प्रकाराचा खेळात केव्हा आणि कसा समावेश झाला.
सांगितले जाते की, साधारण 1898 मध्ये अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या एका फुटबॉल टुर्नामेंटमध्ये पहिल्यांदा चिअर लिडर्स अवतरल्या. या चिअर लिडर्सनी उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले. मैदानावर खेळाडूंनी केलेली मनपसंत कामगिरी आणि चिअर लिडर्सनी केलेले मनोरंजन अशी दुहेरी मेजवानी क्रीडारसिकांना मिळाली.
सुरुवातीला चअर लिडर्स ही कामगिरी पुरुषांकडेच असायची. साधारण 1923 पर्यंत फुटबॉलच्या मैदानावर चिअर लिडर्स म्हणून पुरुषच आपला वरचष्मा गाजवायचे. मात्र, 1923 नंतर चिअर लिडर्स म्हणून महिलांना संधी मिळाली. आज घडीला पुरुष चिअर्स लिडर्सही असतातच. पण, या क्षेत्रावर पूर्णपणे महिलांचा वरचष्मा आहे अशी सध्यास्थिती आहे.
खास करुन अधिकाधिक चिअर लिडर्स या अमेरिका आणि इग्लंड देशातील असतात. महिलांचे प्रमाण चिअर लिडर्स म्हणून अधिक असण्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे त्या प्रचंड सुंदर असतात. त्यांना पाहून लोकांचे लक्ष वेधले जाते. भारतात क्रिकेट वगळता इतर क्रीडा प्रकाराला लोकप्रियता असली तरी म्हणावी तितकी प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे सध्यातरी आयपीएल क्रिकेट स्पर्धा भाव खाऊन जाते. या स्पर्धेत चिअर लिडर्सचा जलवा पाहायला मिळतो.