Rahul Dravid Catches: हरभजन सिंहने शेअर केला राहुल द्रविडच्या जबरदस्त कॅचचा व्हिडिओ, पाहून दिग्गजही म्हणाले-'वाह...फक्त वाह!'
हरभजन सिंहने एक माँटेज व्हिडिओ शेअर केला ज्यात द्रविडने पकडलेले उत्तम कॅच आहेत. हरभजनच्या ट्विटने चाहत्यांनाच नाही तर भूतकाळातील आणि सध्याचे भारतीय क्रिकेटपटूंनाही जुने दिवसच आठवले. अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन आणि इतरांनी द्रविडने व्हिडिओ शेअर करून द्रविडचे कौतुक केले.
भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडला (Rahul Dravid) त्याच्या भक्कम तंत्रासाठी एक महान फलंदाज मानले जाते, परंतु फलंदाजीबरोबर तो एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षकही होता. आपल्या कारकीर्दीत त्याने काही अतिशय आकर्षक झेल घेतले आहेत. द्रविड कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला आहे. कसोटीत त्याने 210 झेल पकडले ज्यातील बहुतेक कॅच त्याने स्लिपमध्ये पकडले आहेत. त्याने आपल्या कारकीर्दीत यशस्वीरित्या बर्याच भूमिका साकारल्या आहे. सौरव गांगुलीनंतर त्याने वनडेमध्ये धावांचा पाठलाग करताना सलग 14 सामने जिंकले. अलीकडेच, हरभजन सिंहने (Harbhajan Singh) एक माँटेज व्हिडिओ शेअर केला ज्यात द्रविडने पकडलेले उत्तम कॅच आहेत. हरभजनच्या ट्विटने चाहत्यांनाच नाही तर भूतकाळातील आणि सध्याचे भारतीय क्रिकेटपटूंनाही जुने दिवसच आठवले. (राहुल द्रविडने सचिन तेंडुलकरला केले पराभूत, विस्डेन इंडिया पोलमध्ये ठरला 50 वर्षातील भारताचा महान कसोटी फलंदाज)
भारतीय दिग्गज खेळाडूंनी हरभजनचा व्हिडिओ रिट्विट करून द्रविडची आठवण काढली. अनिल कुंबळे, रविचंद्रन अश्विन आणि इतरांनी द्रविडने व्हिडिओ शेअर करून द्रविडचे कौतुक केले. पाहा हरभजनचा व्हिडिओ:
भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळेने लिहिले, “एकदम हुशार!”
रविचंद्रन अश्विनने लिहिले: “वाह! फक्त वाह!”
“त्याच्या फलंदाजीसह किंवा त्याच्याशिवाय, तो मैदानात आहे आणि नेहमीच 'द वॉल' असेल! त्याच्या क्रिकेट प्रवासाचा एक भाग राहणे, मैदानावरील प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आणि आनंदोत्सव साजरा करणे हे खरोखर एक आशीर्वाद आहे!” रैनाने लिहिले.
डोमेस्टिक क्रिकेट दिग्गज अमोल मुझुमदारने द्रविडकडून तरुणांना शिकण्याचे आवाहन केले. त्यांनी लिहिले की, “खरोखर शानदार… विकेटनंतर कोणतीही गडबड नाही ..! कोणताही यंगस्टर पहात आहे.”
मुंबईचा स्टार सूर्य कुमार यादवने लिहिले, “चमकदार कॅच”
दिग्गज फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने “सेन्सेशनल” लिहून आपल्या माजी सहकारीची प्रशंसा केली
दरम्यान, द्रविड कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात दिग्गज क्षेत्ररक्षक आहे. 2012 मध्ये निवृत्तीनंतरही खेळाच्या सर्वात प्रदीर्घ स्वरुपात सर्वाधिक कॅच घेण्याचा विक्रम द्रविडच्या नावावर आहे. त्याने आपल्या कसोटी कारकीर्दीत 210 झेल पकडले आहे. द्रविडने 164 कसोटी, 344 एकदिवसीय आणि एक टी-20 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले ज्यामध्ये त्याने अनुक्रमे 13288, 10899 आणि 31 धावा केल्या आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)