Indian Cricket Team: ईशान किशन-पृथ्वी शॉ बनले केएल राहुल आणि शिखर धवन यांच्यासाठी मोठी अडचण, जाणून घ्या ते कसे

भारत विरुद्ध श्रीलंका तीन एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात शिखर धवनच्या ब्रिगेडने श्रीलंकेला 80 चेंडू शिल्लक असताना 7 गडी राखून पराभूत केले. पृथ्वी शॉ आणि ईशान किशन हे भारताच्या विजयाचे नायक ठरले. किशन आणि शॉच्या या खेळीने टीम इंडिया विजयी झाली असली तरी शिखर आणि केएल राहुलसाठी निश्चितच समस्या निर्माण झाल्या असतील.

शिखर धवन आणि ईशान किशन (Photo Credit: Twitter/BCCI)

भारत (India) विरुद्ध श्रीलंका (Sri Lanka) तीन एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) ब्रिगेडने श्रीलंकेला 80 चेंडू शिल्लक असताना 7 गडी राखून पराभूत केले. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि ईशान किशन (Ishan Kishan) हे भारताच्या विजयाचे नायक ठरले. शॉने 24 चेंडूत जबरदस्त 43 धावा केल्या, तर किशनने पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात 42 चेंडूत 59 धावा ठोकल्या. किशनने सामन्यात ज्याप्रकारे फलंदाजी केली तू पाहून तो आपला पहिला एकदिवसीय सामना खेळत असल्याचे दिसले नाही. तो निर्भय खेळला. किशनप्रमाणे शॉनेही आक्रमक फलंदाजी केली. या दोन्ही फलंदाजांनी पहिल्या 15 षटकांत सामना भारताच्या झोळीत टाकला होता. आणि याबद्दल स्वत: कर्णधार धवननेही सामन्यानंतर कबुल केले. (IND vs SL ODI: ड्रेसिंग रूममध्ये Ishan Kishan ने दिलेले आश्वासन मैदानावर येताच केले पूर्ण, Chahal TV वर उघडले आपल्या तुफान बॅटिंगचे रहस्य)

किशन आणि शॉच्या या खेळीने टीम इंडिया (Team India) विजयी झाली असली तरी शिखर आणि केएल राहुल (KL Rahul) साठी निश्चितच समस्या निर्माण झाल्या असतील. टी-20 वर्ल्ड कपपूर्वी भारताची ही अखेरची मर्यादित ओव्हर मालिका असल्यामुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेत संघात एक किंवा दोन रिक्त स्लॉट भरण्याचे व्यासपीठ म्हणून देखील पाहिले जात आहे. रोहित शर्माशिवाय शिखर धवन, विराट कोहली आणि केएल राहुलसुद्धा या सलामीला जागेचे दावेदार आहेत. म्हणजे सलामी जागेसाठी खेळाडूंमध्ये मोठी चढाओढ आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. विराट तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करतो पण तो यंदा आगामी टी-20 मध्ये सलामीला उतरण्याची अधिक शक्यता आहे. पण आता पृथ्वीच्या शानदार शोनंतर ओपनिंग जागेसाठी शर्यतीत वाढ होताना दिसत आहे आणि धवनला संघात स्थान मिळण्याची शक्यता कमी होत जात आहे.

दुसरीकडे, ईशान किशन टी -20 वर्ल्ड कपमध्येही सरप्राईज पॅकेज असू शकते. त्याने तीन आंतरराष्ट्रीय सामने खेळले असले तरी ज्या निर्भय रीतीने त्याने फलंदाजी केली आहे त्याने नक्कीच तज्ञांना खूप प्रभावित केले आहे. ईशान मधल्या फळीबरोबर सलामीच्या स्लॉटमध्येही बसू शकतो. टी-20 वर्ल्ड कपमध्ये ईशानची ही गुणवत्ता संघासाठी उपयोगी ठरू शकते आणि केएल राहुलची जागा अडचणीत निर्माण करू शकते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now