IPL Auction 2025 Live

IND vs BAN 3rd T20I Live Score Update: सूर्य-संजूच्या जोरावर भारताने हैदराबादमध्ये केला कहर, बांगलादेशला दिले 298 धावांचे लक्ष्य

यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे.

Suryakumar Yadav And Sanju Samson (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 3rd T20I Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगालेदशसमोर विजयासाठी 298 डोंगराऐवढे लक्ष्य ठेवले आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली ही भारताची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या आहे. संजू सॅमसनने (111) झंझावाती शतक झळकावले तर कर्णधार सूर्यकुमार यादव (75) याने धमाकेदार अर्धशतक झळकावले. हार्दिक पांड्या (47) पन्नास हुकले. रियान परागने 34 धावांचे योगदान दिले. अभिषेक शर्मा 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

बांगलादेशकडून तनझिम हसन शाकिबने सर्वाधिक तीन बळी घेतले. तन्झीम हसन साकिबशिवाय तस्किन अहमद, मुस्तफिझूर रहमान आणि महमुदुल्लाह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी बांगलादेश संघाला 20 षटकात 298 धावा करायच्या आहेत. हा सामना जिंकून बांगलादेश संघ क्लीन स्वीप टाळू इच्छितो.