India Vs West Indies 2019: भारत आणि वेस्टइंडीज यांच्यातील पहिला टी-20 सामना मुंबईत नव्हेतर हैदराबाद येथे होणार, जाणून घ्या कारण

पुढील महिन्यात भारत विरुद्ध वेस्टइंडीज (India vs West Indies) यांच्यात टी-20 सामना रंगणार असून बीसीसीआयला त्यांच्या वेळापत्रात बदल करावा लागला आहे.

भारतीय संघ (Photo Credit/Getty Image)

भारतीय क्रिकेट संघाने बांगलादेशच्या संघावर दणदणीत विजय मिळवल्यानंतर संघ पुढील सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. पुढील महिन्यात भारत विरुद्ध वेस्टइंडीज (India vs West Indies) यांच्यात टी-20 सामना रंगणार असून बीसीसीआयला त्यांच्या वेळापत्रात बदल करावा लागला आहे. भारत विरुद्ध वेस्टइंडीज यांच्यात पहिला सामना 6 डिसेंबर रोजी खेळला जाणार आहे. परंतु, या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी असल्यामुळे शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम होत असतात. त्यामुळे मुंबई पोलिसांना भारतीय खेळाडूंना सुरक्षा देणे अशक्य आहे. यामुळे बीसीसीआयने क्रिकेट सामन्याच्या मैदानाची आदलाबदली केली असून मुंबई येथे होणार पहिला सामना हैदराबाद येथे खेळला जाणार आहे. तर हैदराबाद येथे खेळला जाणार तिसरा टी-20 सामना मुंबई येथे रंगणार आहे.

एएनआयचे ट्विट-